१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 07:07 IST2025-08-23T07:07:07+5:302025-08-23T07:07:07+5:30
18 Years Rahu Mahadasha: राहु भरपूर धन व ऐहिक सौख्य देणारा, शनिप्रमाणे फल देणारा ग्रह आहे, असे म्हटले जाते. तुमची सुरू आहे का राहु महादशा? जाणून घ्या...

18 Years Rahu Mahadasha: ज्योतिषशास्त्रात राहु आणि केतु या दोन ग्रहांना छाया ग्रह मानले जाते. राहु आणि केतु यांना नवग्रहांमध्ये स्थान असून, ते विशेष मानले जाते. कुंडलीतील राहु-केतु यांच्या स्थानांवरून व्यक्तींवरील प्रभाव पाहिला जातो. हे दोन्ही ग्रह एकमेकांसमोर असतात. म्हणजेच एकमेकांपासून सातव्या समसप्तक स्थानी असतात.
राहु आणि केतु यांचे चलन कायम वक्री असते. ते कधीही मार्गी होत नाहीत. राहु-केतु हे आकाशात दिसणारे ग्रह नाहीत. ते गणितसिद्ध बिंदू आहेत. ते ज्या ग्रहांबरोबर असतात, त्या ग्रहांना आपली शक्ती देतात अथवा त्या ग्रहांप्रमाणे फल देतात, अशी मान्यता आहे. राहु हा पापग्रह आहे.
कन्या राशी ही याचे स्वगृह आहे. वृषभ ही मूलत्रिकोणराशी आहे. मिथुन उच्चरास आणि धनु ही नीचरास मानली गेली आहे. याची उपास्यदेवता कालिका आहे. सत्तावीस नक्षत्रांपैकी आर्द्रा, स्वाती व शततारका या नक्षत्रांचे स्वामित्व राहुकडे आहे. या नक्षत्रपरत्वे येणाऱ्या विशोंत्तरी महादशेत राहु महादशेचा काल सुमारे १८ वर्षांचा आहे.
बुध, शुक्र, शनि हे याचे मित्र आहेत तर रवि, चंद्र, मंगळ हे शत्रू आहेत. गुरुशी हा समत्वाने वागतो. मूलांक ४ वर राहुचा अंमल असल्याचे मानले जाते. काहींच्या मते अंकशास्त्राप्रमाणे राहुला अधिकृत असा कोणताही अंक नाही. रावाचा रंक आणि रंकाचा राव किंवा गरिबालाही राजा करण्याची ताकद राहु ग्रहात असते, अशी मान्यता असल्याचे म्हटले जाते.
एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहु ग्रह कोणत्या स्थानी आहे, राहुशी कोणत्या ग्रहाशी युती आहे का, राहुवर कोणत्या ग्रहाची दृष्टी पडते का, दृष्टी असेल, तर ती शुभ आहे की प्रतिकूल आहे, अशा अनेक गोष्टींचा विचार करून राहुचा त्या व्यक्तीवर प्रभाव कसा असेल, याबाबत भविष्यकथन केले जाऊ शकते.
जर जन्मकुंडलीत राहु ग्रह शुभ स्थानी असेल तर, ती व्यक्ती सुंदर असते. त्याचे व्यक्तिमत्व प्रभावी असते. अशी व्यक्ती काम करण्यात कुशल असते. ती व्यक्ती समाजात प्रभावशाली बनते. लोकप्रिय असते. राजकारणात खूप चांगले नाव. कीर्ती मिळू शकते. त्याला आदर आणि कीर्ती मिळते.
अशा व्यक्तीला कमी कष्टात चांगले यश प्राप्त करू शकतात. जर एखाद्या व्यक्तीला राहु ग्रहाची महादशा असेल तर त्याला चांगले परिणाम मिळतात. त्या व्यक्तीला अचानक, अमाप संपत्ती प्राप्त होऊ शकते. अर्थ शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये चांगला नफा होऊ शकतो. जर राहु ग्रह शुभ स्थानी असेल तर अशी व्यक्ती शहर किंवा गावाचा प्रमुख बनू शकतो.
राहु हा भरपूर धन व ऐहिक सौख्य देणारा ग्रह आहे. राहु अनुकूल असता जातक सत्ता, अधिकार व अनेक प्रकारचे ऐहिक सौख्य भोगणारा असतो. बलवान राहु राजासारखे सुख देतो. तीव्र स्मरणशक्ती व संशोधनवृत्ती देणारा असल्याने उच्चशिक्षण व संशोधन कार्यास चांगला मानला जातो.
जन्मकुंडलीत राहु ग्रह अशुभ असेल, म्हणजेच नीच स्थितीत असेल, तर व्यक्ती वाईट सवयींमध्ये अडकते. अशी व्यक्ती व्यसनी असते. पीडित राहु प्रभावामुळे व्यक्ती फसवणूक करू शकते. अशा व्यक्तीला तीव्र नैराश्यही येऊ शकते.
नकारात्मक, प्रतिकूल स्थितीतील राहुमुळे व्यक्तीला समाजात बदनामीला सामोरे जावे लागते. ती व्यक्ती नास्तिकही होऊ शकते. देवावर विश्वास ठेवत नाही. अशुभ राहूमुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या येऊ शकतात किंवा त्या वाढू शकतात, असे सांगितले जाते. जर राहु ग्रह कुंडलीत अशुभ स्थानी असेल, तर व्यक्तीला अनेकदा अचानक मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते, असे म्हटले जाते.
एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरु-राहु युती हा चांडाळ योग असेल, तर या योगात राहुचे दोष सुधारतात पण गुरु दुषित होतो. पत्रिकेत सर्व ग्रह जर राहु-केतु मध्ये अडकले तर कालसर्पयोग होतो. राहु शनिप्रमाणे फल देणारा आहे, असे मानले जाते.
सदर दाव्यांची पुष्टी केली जात नाही. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.