तरूणींना 'असा' परफ्यूम वापरणारे तरूण आवडतात, तुम्ही सुद्धा 'तेच' वापरता की वेगळं?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 10:03 AM2020-02-22T10:03:55+5:302020-02-22T10:19:48+5:30

नुकत्याच करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये तरूणींना हे विचारण्यात आलं की त्यांना कोणत्या प्रकारचं परफ्यूम वापरणारे तरूण पसंत आहेत? यावर तरूणींनी वेगवेगळ्या प्रकारची उत्तरे दिली.

तरूणींची मने जिंकण्यासाठी तरूण नको नको त्या गोष्टी करत असतात. आता तर तरूण ब्युटी प्रॉडक्ट्सचा देखील वापर करू लागले आहेत. त्यावर भरमसाठ पैसेही खर्च करू लागले आहेत. यात परफ्यूम सर्वात महत्वाची भूमिका बजावतं.

आता तर तरूणांच्या परफ्यूममुळेही तरूणी त्यांच्याकडे आकर्षित होत आहे. यावर रिसर्चही करण्यात आलाय. नुकत्याच करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये तरूणींना हे विचारण्यात आलं की त्यांना कोणत्या प्रकारचं परफ्यूम वापरणारे तरूण पसंत आहेत? यावर तरूणींनी वेगवेगळ्या प्रकारची उत्तरे दिली. (Image Credit : waytoosocial.com)

चॉकलेटचा सुगंध करतो जादू - चॉकलेट प्रत्येक तरूणीला आवडतं. त्यामुळे जर तरूणांनी चॉकलेटचा सुगंध असलेला परफ्यूम लावला तर त्यांच्याकडे तरूणी आकर्षित होतात. चॉकलेटच्या सुगंधाकडे तरूणी मानसिक रूपाने आकर्षित होतात. त्यामुळे तुम्ही चॉकलेट परफ्यूम वापरत असाल तर तुमचा फायदाच आहे. नसाल वापरत तर विचार करायला हरकत नाही.

स्ट्रॉंग फ्रेगरेन्सचा वेगळा अर्थ - या फ्रेगरेन्सचा वापर करणाऱ्या तरूणांनाही तरूणी पसंत करतात. अशाप्रकारच्या पुरूषांना कोणत्याही गोष्टी जास्त उत्सुक मानलं जातं. तसेच याने तरूणाच्या बोल्ड अंदाजाची माहिती मिळते. तरूणींचं असं मत आहे की, असे तरूण जास्त रोमॅंटिक असतात. (Image Credit : makeup.lovetoknow.com)

फुलांचा सुगंधीही येतो कामी - फुलांचा सुगंध आवडणाऱ्या तरूणींचं नेचर फार प्रेमळ असतं. त्या अशाच तरूणांना पसंत करतात, ज्यांच्यात त्या त्यांच्या आवडीच्या गोष्टी बघू शकतात. तरूणींना असं वाटतं की, फुलांच्या सुगंधाचं परफ्यूम लावणारे तरूणी नात्यात अधिक प्रामाणिक असतात. तुम्हीही एकदा हे ट्राय करून बघू शकता.

अल्कोहोलचा सुगंधही तरूणींना आवडतो - तुम्ही पाहिलं असेल की, काही तरूण फारच विचित्र सुगंध असणारे परफ्यूम लावतात. यांचा सुगंध अल्कोहोलच्या सुगंधाशी मिळता-जुळता असतो. या परफ्यूमचा वापर करणाऱ्या तरूणांना तरूणी क्लासी मानतात. रिसर्चमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, अशा परफ्यूमचा वापर करणारे तरूण जास्त उत्तेजक असतात.

फळांचा सुगंध तरूणींना क्यूट वाटतो - फळांच्या सुगंधाचा परफ्यूम वापरणारे तरूण मुलींना त्यांच्या पर्सनॅलिटीमुळे पसंत पडतात. तरूणींचं मत आहे की, असे तरूण मनाने साफ असतात. रिपोर्टनुसार, असे तरूण हसमुख असतात आणि आपल्या पार्टनरला त्रास देत नाहीत. (Image Credit : stylecraze.com)

लॉन्ग लास्टिंग परफ्यूम - लॉन्ग लास्टिंग परफ्यूमचा वापर करणारे तरूणही तरूणींना पसंत असतात. असे तरूण तरूणींना पसंत असतात कारण ते घामाच्या दुर्गंधीपासून बराचवेळ दूर राहता. रिसर्चनुसार, असे तरूण आपल्या बॉडीसाठी फार अॅक्टिव असतात. अशात परफ्यूम खरेदी करताना याचीही काळजी घ्यावी.