चमकदार त्वचेसाठी कितीदा स्क्रब करता? वाचा स्क्रब करण्याची योग्य पद्धत!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 12:35 PM2018-11-19T12:35:24+5:302018-11-19T12:42:20+5:30

त्वचा मुलायम आणि चमकदार करण्यासाठी स्क्रबचा वापर आता सामान्य बाब झाली आहे. घरी किंवा पार्लरमध्ये सहजपणे स्क्रब केलं जातं. त्यामुळे अनेकजण वेगवेगळ्या स्क्रबचा सर्रास वापर करतात. पण स्क्रब वापरण्याचीही एक पद्धत असते. हे काही नियम व्यवस्थित फॉलो केले गेले नाही तर त्वचा सुंदर होण्याऐवजी खराब होऊ शकते. स्क्रब चेहऱ्या व्यतिरिक्त शरीराच्या वेगवेगळ्या भागांवरही वापरलं जाऊ शकतं. पण स्क्रब करताना काही गोष्टींची काळजी घेणे फार गरजेचे आहे. चला जाणून घेऊ त्या खास गोष्टी...(Image Credit : www.skincareguide.com)

१) पटापट किंवा घाईघाईने स्क्रब करणे त्वचेसाठी अजिबात चांगलं नसतं. तज्ज्ञांचं मत आहे की, आठवड्यातून दोनपेक्षा जास्त वेळ स्क्रब करणे त्वचेसाठी नुकसानकारक ठरु शकतं.

२) जर त्वचा सामान्य आहे तर आंघोळ करताना माइल्ड फेसवॉशने चेहरा धुवा आणि नंतर स्क्रबचा वापर करा. फार जास्त प्रमाणात स्क्रब घेऊ नेय आणि हे चेहऱ्यावर सर्कुलर पध्दतीने लावा. (Image Credit : divalikes.com)

३) चेहऱ्यावरील मृत पेशी दूर करण्यासाठी आणि त्वचा चमकदार करण्यासाठी पील-ऑप जेलचा वापर केला जातो. या केमिकलने डेड स्किन दूर झालेली असते, अशात स्क्रबचा वापर करणे त्वचेसाठी समस्या निर्माण करु शकतं. याने त्वचेवर पुरळ येणे किंवा इन्फेक्शन होणे या समस्या होतात.

४) स्किन लायटनरनंतर स्क्रबचा वापर अजिबात करु नये. स्किन लायटनरमध्ये असलेलं केमिकल त्वचेच्या वरच्या भागाचं नुकसान करतं. अशात यावप स्क्रब केलं तर याचा उलटा परिणाम होऊ शकतो. याने त्वचेवर सूज येणे आणि इन्फेक्शन होणे अशा समस्या होतात.