तेलकट त्वचेमुळे आहात हैराण?, करा या 5 गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 04:29 PM2018-07-11T16:29:19+5:302018-07-11T16:32:10+5:30

क्लींजरनं केवळ 10 मिनिटांसाठी हलक्या हातानं चेहऱ्याचा मसाज करावा. यानंतर ओल्या टिशू पेपर चेहरा पुसावा.

तेलकट त्वचेवर जेव्हा स्क्रबिंग कराल तेव्हा बोटांनी हळू-हळू स्क्रब करावे. जोरात स्क्रब कधीही करू नये.

त्वचेच्या प्रकारानुसार मॉयश्चरायजरचा वापर करावा. तेलकट त्वचा असणाऱ्यांनी मॅट फिनिश असलेले मॉयश्चरायजरचा वापर करावा.

जिम घरापासून 5 मिनिट अंतरावर असो अथवा 30 मिनिटांच्या अंतरावर असो. चेहऱ्यावर तेल अधिकवेळ राहू देऊ नये. जिममध्ये चेहरा धुऊन बाहेर पडावे.

वारंवारदेखील चेहरा धुणे चांगले नसते. एकदा सकाळी, दुपारी आणि झोपण्यापूर्वी तसंच घाम आल्यास चेहरा धुवावा किंवा क्लिजिंग करावा.