झुक झुक झुक झुक... कार निघाली, धुराच्या रेषा हवेत काढी! पेट्रोल पंप, इंजिन, या बाबी कारणीभूत असतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 12:20 PM2024-01-07T12:20:26+5:302024-01-07T12:26:23+5:30

वाहनातून धूर जास्त निघण्याची अनेक कारणे आहेत. पहिले म्हणजे तुम्ही जितून इंधन भरता तो पेट्रोल पंप.

अनेकदा पीयुसी प्रमाणपत्र नसलेल्या गाड्या रस्त्यांवर धावत असतात. जे काढतात त्यांच्या गाड्यांमधून अनेकदा प्रमाणापेक्षा जास्त धूर निघत असतो. मग आरपीएस अॅडजस्ट करून तो धूर नियंत्रित केला जातो आणि प्रमाणपत्र दिले जाते. डिझेल वाहनांमध्ये ही समस्या जास्त असते. याचे कारण काय? 

वाहनातून धूर जास्त निघण्याची अनेक कारणे आहेत. पहिले म्हणजे तुम्ही जितून इंधन भरता तो पेट्रोल पंप. या पेट्रोल पंपावरील टाक्या काही कालावधीनंतर स्वच्छ करायच्या असतात. परंतु, बऱ्याच ठिकाणी ते केले जात नाही. यामुळे मळ तुमच्या वाहनाच्या टाकीत यायला लागते. 

अनेकदा आपण पेट्रोल पंपावर त्यांच्या स्टोरेजमध्ये टँकरमधून इंधन सोडत असताना किंवा सोडल्यानंतर लगेचच आपल्या गाडीत इंधन भरतो. या गोष्टी आपल्याला माहिती नसतात. यामुळे आपसुकच गढूळ इंधन आपल्या इंजिनाता जात असते. याचा परिणाम ज्वलनावर होतो आणि त्यातून धूर जास्त निघू लागतो. 

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काचे इंजिन, त्यात काही समस्या असली तर इंधन पूर्णपणे जळत नाही. यामुळे धूर जास्त येऊ लागतो. एव्हरेजही कमी होते. याकडे बराच काळ लक्ष दिले नाही तर तुम्हाला लाखभर रुपयाचे इंजिन काम येऊ शकते. 

जर तुमची कार अचानक जास्तीचा धूर सोडू लागली तर कार इंजिनचे ट्युनिंग खराब झाले समजावे. म्हणजे इंजिनाकडे जाणारे इंधन जास्त वेगाने जाते. यामुळे जास्त प्रदूषण होऊ शकते. 

पेट्रोल पंपांवरील भेसळयुक्त इंधन देखील तुम्हाला त्रासदायक ठरते. यामुळे आजुबाजुच्या लोकांचे अनुभव, त्या पेट्रोल पंप मालकाची हिस्ट्री आदी गोष्टींची माहिती घ्यावी. बाहेरगावी इंधन भरत असाल तर या गोष्टी समजत नाहीत. परंतु, बरेचदा तुम्ही तुमच्या भागातीलच पंपांवर इंधन भरता. 

कमी प्रदूषण होण्यासाठी कारमध्ये कन्व्हर्टरचा वापर केला जातो. इंजिनमधून बाहेर पडणारे हानिकारक वायू बाहेर जाणार नाहीत याची खात्री करणे हे त्याचे कार्य आहे. यासाठी कन्व्हर्टरमध्ये सिलिकॉन रॉड बसवले जातात. एकदा का ते खराब झाले की, कार देखील जास्त धूर सोडू लागते.

कारमधील विविध प्रकारचे सेन्सर कोणत्याही समस्येशिवाय कार चालविण्यास मदत करतात. पण जर कोणताही सेन्सर नीट काम करत नसेल तर कारमध्ये समस्या येऊ लागतात. असे काही सेन्सर कारमधील इंजिनला जोडलेले असतात. एकदा हे सेन्सर्स बिघडले की, कार जास्त धूर सोडू लागते.