शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

इलेक्ट्रीक कार खरेदी केल्यास मिळतेय ३ लाखांची सूट; पाहा कसा घेऊ शकता हा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2021 2:41 PM

1 / 10
मोठ्या शहरांमध्ये प्रदुषणाचा धोका अधिक आहे. दरम्यान, या धोका टाळण्यासाठी सरकारकडून काही उपाययोजना लागू करण्यात येत असतात.
2 / 10
काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी इलेक्ट्रीक कार्सना चालना देण्यासाठी मोठी घोषणा केली होती.
3 / 10
यासाठी दिल्ली सरकानं इलेक्ट्रीक वाहनांसाठी दिल्ली स्वीच ही मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत सरकारन इलेक्ट्रीक वाहनांवर मोठी सूट देत आहे.
4 / 10
दिल्ली सरकारनं इलेक्ट्रीक वाहनांवर १.५ लाख रूपयांची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. याव्यतिरिक्त इलेक्ट्रीक वाहनांवरील रोड टॅक्स आणि रजिस्ट्रेशनदेखील मोफत करण्यात आलं आहे.
5 / 10
या घोषणेमुळे दिल्लीतील पेट्रोलवर चालणारी वाहनं कमी होऊन प्रदुषणदेखील कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
6 / 10
२०२४ पर्यंत दिल्लीत नव्यानं विक्री होणाऱ्या वाहनांपैकी २५ टक्के इलेक्ट्रीक वाहनं असू शकतात असा अंदाज केजरीवाल सरकारनं व्यक्त केला आहे.
7 / 10
याअंतर्गत दुचाकी आणि तीनचाकी वाहनांसाठी ३० हजार रूपयांचं अनुदान देणअयाचा निर्णय केजरीवाल सरकारनं घेतला आहे. तर इलेक्ट्रीक कार्समध्ये १.५ लाख रूपयांचं अनुदान देण्यात येईल.
8 / 10
याशिवार या वाहनांवर कोणत्याही प्रकारे रोड टॅक्स आणि रजिस्ट्रेशन चार्ज आकारला जाणार नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
9 / 10
XM ट्रिमवर रोड टॅक्स आणि रजिस्ट्रेशनवर १ लाख ४० हजार ५०० रूपयांची सूट देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त XZ+ व्हेरिअंट्सवर १ लाख ४९ हजार ९०० रूपयांची सूट मिळेल.
10 / 10
दिल्ली सरकार आता Tata Nexon EV च्या खरेदीवर ३ लाख रूपयांपेक्षा अधिक सूट देत आहे.
टॅग्स :delhiदिल्लीChief Ministerमुख्यमंत्रीArvind Kejriwalअरविंद केजरीवालelectric vehicleवीजेवर चालणारं वाहनTataटाटाMG Motersएमजी मोटर्स