Vespa 75th Anniversary Edition झाली लाँच; पाहा स्कूटरचा स्टायलिस्ट आणि आकर्षक लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 10:41 PM2021-09-05T22:41:31+5:302021-09-05T22:47:31+5:30

Vespa ब्रँडला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीनं Vespa 75th Anniversary Edition लाँच केली आहे.

Piaggio India ने Vespa ब्रँडला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर Vespa 75th Anniversary Edition लाँच केली आहे. Vespa 75th Anniversary Edition ही स्कूटर 125cc आणि 150cc या व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे.

पुण्यात Vespa 75th Anniversary Edition 125cc ची किंमत 1.26 लाख रूपये आणि 150cc व्हेरिअंटची किंमत 1.39 लाख रूपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. वेस्पाची ही खास एडिशन असलेली स्कूटर ऑनलाइन ५ हजार रूपयांचं टोकन देऊन बूक केली जाऊ शकते. कंपनीनं आपली ही स्कूटर १९० शहरांमध्ये आपल्या २७५ डिलर्सद्वारे विक्रीसाठी उपलब्ध करून देणार आहे.

नवीन वेस्पामध्ये अनेक कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. यामध्ये, एक्सक्लूसिव्ह पेंट स्कीमसह मागील बाजूस लेदर बॅग देखील देण्यात आली आहे. स्कूटरच्या मागील बाजूस दिलेली ही लेदर बॅग अतिशय स्टायलिश आहे आणि दिसण्यात ती एक स्पेअर व्हिल असल्याचा भास होतो.

कंपनीने स्कूटरमध्ये एक खास ग्लॉसी मेटॅलिक गियालो पेंट स्कीम वापरली आहे आणि ती 75 च्या बॅजिंगसह येते. 75 चे हे बॅजिंग स्कूटरच्या साइड पॅनल, फ्रंट फेंडर्स आणि ग्लोव्हबॉक्सवर दिलं आहे.

स्कूटरसोबत फ्लॅट टाईप स्मोर ग्रे लेटर सीटही देण्यात आली आहे. स्कूटरच्या लूकला डायमंड कट अलॉय व्हिल्ससोबत सायलेन्सर आणि मिररवर देण्यात आलेले क्रोम फिनिश अतिशय प्रीमिअम बनवतात. स्कूटरमध्ये तुम्हाला एलईडी हेडलँपसह अॅनॉलॉग इन्स्ट्रूमेंट क्लस्टर पाहायला मिळतात.

इंजिन आणि पॉवर बाबत सांगायचं झालं तर 125cc स्कूटरचं इंजिन 7500rpm वर 9.93hp आणि 5500 rpm वर 9.6Nm चा टॉर्क जनरेट करते. तर 150cc व्हेरिअंटचं इंजिन 7600rpm वर 10.4hp आणि 5500rpm वर 10.6Nm चा टॉर्क जनरेट करतं.