Honda Activa ला टक्कर द्यायला TVS सज्ज! बेस्ट सेलिंग स्कूटर ‘हायटेक’ रुपात करणार लॉंच; पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 01:10 PM2021-10-06T13:10:00+5:302021-10-06T13:14:53+5:30

TVS Motors लवकरच आपली लोकप्रिय स्कूटर देशांतर्गत बाजारात नवीन रुपात लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे.

गेली अनेक वर्षे स्कूटर सेगमेंटमध्ये Honda Activa ने निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. हिरो मोटोकॉर्पपासून वेगळे झाल्यानंतरही Honda Activa ची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. मात्र, TVS ने या सेगमेंटमध्ये एन्ट्री घेत दमदार कामगिरी करून दाखवली.

मात्र, काही झाले तरी Honda Activa चे प्रथम स्थान कायम राहिले आहे. अशातच आता देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी TVS Motors लवकरच आपली लोकप्रिय स्कूटर टीव्हीएस ज्युपिटर देशांतर्गत बाजारात नवीन रुपात (TVS Jupiter 125) लाँच करण्यासाठी सज्ज आहे.

TVS ने आता नव्या स्कूटरचा टीझर जारी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही स्कूटर ७ ऑक्टोबर रोजी लाँच होणार आहे. टीझर व्हिडिओवरून कंपनीने नवीन TVS ज्युपिटरमध्ये LED डे-टाईम रनिंग लाईट्स दिले आहेत.

DRL स्कूटरच्या फ्रंट ऐप्रनवर दिले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये LED DRL सोबतच LED हेडलाइट आणि टेललाइट असतील, तसेच इंस्ट्रूमेंट क्लस्टरमध्येही बदल झालेला दिसेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी ही शानदार स्कूटर नवीन लूक आणि फीचर्ससह जास्त पॉवरफुल इंजिनसोबत लाँच करेल.

भारतात TVS Jupiter ही स्कूटर बरीच लोकप्रिय असून ही कंपनीचीही बेस्ट सेलिंग स्कूटर आहे. या स्कूटरमध्ये कंपनी NTorq 125 प्रमाणे १२४.८ सीसी सिंगल-सिलेंडर फ्यूल-इंजेक्टेड इंजिन देऊ शकते.

नवीन TVS Jupiter चे इंजिन ७,००० rpm वर ९.१ bhp पॉवर आणि ५,५०० rpm वर १०.५ Nm पीक टॉर्क जनरेट करतं. इंजिनसोबत सीवीटी गिअरबॉक्स यूनिट आहे. नवीन स्कूटरमध्ये समोर, डिस्क ब्रेकसह टेलिस्कोपिक सस्पेंशन दिले जाऊ शकते.

स्कूटरमध्ये आकर्षक डायमंड कट अलॉय व्हील्स असल्याच्याही बातम्या आल्या आहेत, ज्यात ट्यूबलेस टायर्स दिले जातील. यामध्ये जास्त अंडर सीट स्टोरेज (सीटखाली सामान ठेवण्यासाठी जागा) मिळेल. नवीन TVS Jupiter मध्ये स्मार्टफोन कनेक्टिविटी देखील असेल.

रिपोर्ट्सनुसार, अपकमिंग ज्यूपिटर १२५ मध्ये एक डिजिटल स्क्रीन, एक्स्टर्नल फ्यूअल फिलर, सायलेंट स्टार्ट आणि नेविगेशन असिस्ट, टॉप स्पीड रेकॉर्डर, इन-बिल्ट लॅप-टायमर अशा सुविधांसाठी टीव्हीएस कनेक्ट मोबाइल अॅपसारखे फीचर्स दिले जातील.

याशिवाय साइड स्टँड कटऑफ, इंजिन किल-स्विच असे फीचर्सही मिळतील. ही स्कूटर देशात सर्वात जास्त विक्री होणाऱ्या Honda Activa 125, सुझुकी एक्सेस १२५ ला टक्कर देईल, असे सांगितले जात आहे. दरम्यान, TVS ने भारतातील सर्वात मोठ्या इंटीग्रेटेड वीज कंपन्यांपैकी एक असलेल्या Tata Power शी धोरणात्मक भागीदारी केली आहे.

या भागीदारीचे उद्दिष्ट भारतातील इलेक्ट्रिक मोबिलिटीला गती देण्यासाठी मोठ्या प्रमाणात समर्पित इलेक्ट्रिक दुचाकी चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणे आहे. TVS iQube च्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या ग्राहकांना कस्टमर कनेक्ट अॅप आणि टाटा पॉवर EZ चार्ज अॅपद्वारे संपूर्ण भारतभर टाटा पॉवरद्वारे व्यापक चार्जिंग नेटवर्कमध्ये प्रवेश मिळेल.