मारुती सुझुकीच्या सर्वाधिक मायलेज असलेल्या सीएनजी कार; 75 रुपयांत 35 किमी रेंज
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 13:02 IST2022-08-24T12:45:40+5:302022-08-24T13:02:03+5:30
Maruti Suzuki CNG Cars : मारुती सुझुकीच्या टॉप 5 सर्वाधिक मायलेज असलेल्या सीएनजी कारबाबत जाणून घ्या...

नवी दिल्ली : अलीकडच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्यामुळे सीएनजी कार खूप लोकप्रिय झाल्या आहेत. गेल्या काही काळात सीएनजीच्या किमतीही वाढल्या असल्या तरी त्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीच्या तुलनेत कमी आहेत. अशा स्थितीत अनेक कार उत्पादक कंपन्या सीएनजी मॉडेल ऑफर करत आहेत. मात्र, मारुती सुझुकीकडे सीएनजी मॉडेल्सची मोठी रेंज आहे. दरम्यान, मारुती सुझुकीच्या टॉप 5 सर्वाधिक मायलेज असलेल्या सीएनजी कारबाबत जाणून घ्या. दिल्लीत सीएनजीची किंमत सुमारे 75 रुपये प्रति किलो आहे.
Maruti Suzuki Celerio CNG
मारुती सुझुकी सेलेरिओ सीएनजीचे (Maruti Suzuki Celerio CNG) मायलेज 35.60 किमी/किलो आहे. व्हीएक्सआय ट्रिममध्ये मारुती सुझुकी सेलेरियो सीएनजीची एक्स-शोरूम किंमत 6.7 लाख रुपये आहे. मारुती सुझुकी सेलेरियो सीएनजीमध्ये 1.0-लिटर पेट्रोल इंजिन आहे, जे 56 bhp आणि 82 Nm टॉर्क निर्माण करते. यात 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे.
Maruti Suzuki WagonR CNG
मारुती सुझुकी वॅगनआर सीएनजीचे (Maruti Suzuki WagonR CNG) मायलेज 34.05 किमी/किलो आहे. मारुती सुझुकी वॅगनआर सीएनजी LXi आणि VXi ट्रिममध्ये येते. या कारच्या किंमती 6.34 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होतात. यात 998 cc, 3 सिलिंडर इंजिन आहे. यात 5- स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देखील मिळतो.
Maruti Suzuki Alto 800 CNG
मारुती सुझुकी अल्टो 800 सीएनजी (Maruti Suzuki Alto 800 CNG) 31.59 किमी/किलो मायलेज देते. भारतातील ही सर्वात स्वस्त सीएनजी ऑफर आहे. मारुती सुझुकी अल्टो 800 सीएनजीची किंमत 5.03 लाख रुपयांपासून सुरू होते. याला 0.8 लीटर इंजिन मिळते, जे 40 bhp पॉवर आणि 60 Nm टॉर्क जनरेट करते. यात मॅन्युअल गिअरबॉक्स मिळतो.
Maruti Suzuki Swift Dzire CNG
मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर सेडान सीएनजीचे (Maruti Suzuki Swift Dzire CNG) मायलेज 31.12 किमी/किलो आहे. मारुती सुझुकी डिझायर सीएनजी VXi आणि ZXi ट्रिममध्ये ऑफर केली जाते. कारचे इंजिन 76 bhp पॉवर आणि 98 Nm टॉर्क जनरेट करते. हे 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह देखील येते. कारची एक्स-शोरूम किंमत 8.14 लाख रुपये आहे.
Maruti Suzuki Swift CNG
मारुती सुझुकी स्विफ्ट सीएनजी (Maruti Suzuki Swift CNG) नुकतेच भारतात लॉन्च करण्यात आली, ज्याची किंमत 7.77 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. स्विफ्ट सीएनजी VXi आणि ZXi ट्रिममध्ये ऑफर केली जाते आणि 30.9 किमी/किलो मायलेज देते. कारमध्ये 1.2-लिटर इंजिन आहे, जे 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.