Maruti 800: ...तर मारुती सुझुकी तुम्हा-आम्हाला कधी दिसली पण नसती; टाटांनीही मागितलेले लायसन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 10:49 AM2021-09-27T10:49:59+5:302021-09-27T10:58:51+5:30

Maruti made first 21 cars but never came on Road: खरेतर संजय गांधींनी ही कंपनी उभी केली. कमी दराने शेकडो एकर जमीन मिळवूनही अनेक वर्षे वाया घालविली. यानंतर संजय गांधी यांनी केवळ 21 कार बनविल्या होत्या. ही कार रस्त्यावर धावणे दूर पण कधी शोरुमचे तोंडही पाहू शकल्या नाहीत.

मारुती सुझुकी (Maruti Suzuki) हे नाव देशात क्वचितच कुणाला माहिती नसेल. देशातील रस्त्यांवर धावणाऱ्या सर्वाधिक कार या मारुतीच्याच असतात. कंपनीने 40 वर्षांपूर्वी गरिबांची मर्सिडीज कार लाँच केली होती. मारुती 800 (Maruti 800) तिचे नाव होते. ही कार मारुतीला एका उंचीवर घेऊन गेली. या कारशी संजय गांधींचे कनेक्शन (Maruti Sanjay Gandhi Connection) देखील अनेकांना माहिती आहे. (Sanjay Gandhi, Maruti Suziki Story, Failure of first 21 cars built by Sanjay Gandhi.)

खरेतर संजय गांधींनी ही कंपनी उभी केली. कमी दराने शेकडो एकर जमीन मिळवूनही अनेक वर्षे वाया घालविली. यानंतर संजय गांधी यांनी केवळ 21 कार बनविल्या होत्या. ही कार रस्त्यावर धावणे दूर पण कधी शोरुमचे तोंडही पाहू शकल्या नाहीत. इंदिरा गांधींची पुन्हा सत्ता आली नसती तर मारुती तुम्हा आम्हाला दिसली देखील नसती.

कहाणी सुरु होते 1950 पासून. सरकारला तेव्हा सामान्यांसाठी कार असावी अशी गरज भासू लागली. यावर चर्चा करण्यासाठी समित्यादेखील बनविण्यात आल्या. 1959 आणि 1960 मध्ये दोन समित्यांनी सामान्यांच्या कारवर जोर दिला.

यानंतर छोट्या कार बनविण्यासाठी कंपन्यांकडून अर्ज मागविण्यात आले. यासाठी सरकारला एक दशक लागले. सरकारला एकूण 18 कंपन्यांकडून अर्ज मिळाले. यामध्ये टाटांची टेल्कोदेखील होती. जी आता टाटा मोटर्स झाली आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान इंदिरा गांधींचा मुलगा संजय गांधी यांची कंपनी मारुतीने देखील अर्ज केला होता.

सरकारने मारुतीचा अर्ज मंजूर केला. सरकारने गुरुग्राममध्ये मारुतीला 12000 रुपये एकरने 297 एकर जमीन दिली. सामान्य लोकांच्या बजेटमध्ये बसणारी कार बनविणे हा उद्देश होता. यासाठी सुरुवातीला अंदाजे किंमत 8000 रुपये असेल असे मानण्यात आले.

मात्र, काही वर्षे गेली तरी कार काही तयार होत नव्हती. अखेर मे 175 मध्ये सामान्य लोकांच्या या कारबाबत चर्चा होऊ लागली. कारची एक्स शोरुम किंमत ठरली ती अंदाजापेक्षा तिपट्टीने अधिक होती. 21000 रुपये.

इकडे संजय गांधींनी पण घोषणा केली, दर महिन्याला 12 ते 20 कार बनविणार. त्यानंतर पुढील चार वर्षांत उत्पादन वाढवून 200 कार प्रति दिवस करण्याचा दावा केला. मात्र, 31 मार्च 1976 पर्यंत संजय गांधी केवळ 21 मारुती कार बनवू शकले.

इंदिरा गांधी यांनी जून 1975 मध्ये आणीबाणी घोषित केली होती. या काळात संजय गांधी यांनी राजकारणात उडी घेतली. तेव्हा देखील ते मारुतीचे एमडी होते. आणीबाणीतही ते महिन्याला 4000 रुपये पगार कंपनीकडून घेत होते.

आणीबाणी हटल्यानंतर जेव्हा 1977 मध्ये देशात निवडणुका झाल्या तेव्हा इंदिरा गांधी हरल्या. मारुतीचे प्रकरण न्यायालयात गेले. 1978 मध्ये न्यायालयाने मारुतीला बंद करण्याचा आदेश दिला. मारुती आणि सामान्यांच्या कारवर मोठा फुलस्टॉप लागला.

1980 मध्ये पुन्हा निवडणूक लागली आणि इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्या. परंतू तेव्हाच 1980 मध्ये संजय गांधी यांचे एका विमान दुर्घटनेत निधन झाले. केंद्र सरकारने मारुती ताब्यात घेतली. जपानची कंपनी सुझुकीसोबत मिळून कार बनविण्यास सुरुवात केली. अखेर 1983 मध्ये पहिली मारुती 800 कार शोरुममध्ये पोहोचली.

महत्वाचे म्हणजे संजय गांधी यांनी तयार केलेली कार आणि सझुकीसोबत रस्त्यावर तयार झालेली कार याध्ये जमीन आसमानाचा फरक होता. फक्त एकच गोष्ट सारखी होती. ती म्हणजे कार कंपनीचे नाव. बाकी साऱ्या गोष्टी वेगळ्या होत्या.