Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 18:09 IST2025-10-31T18:05:10+5:302025-10-31T18:09:29+5:30
Suzuki Access CNG : कंपनीने यात ड्युअल-फ्युएल स्विचिंग सेफ्टी सिस्टिम, लीक डिटेक्शन सेंसर आणि ऑटो कट-ऑफ वॉल्व्हसारखे फिचर्स दिले आहेत.

Suzuki Access CNG : पेट्रोलच्या वाढत्या किमती लक्षात घेता, ऑटोमोबाइल कंपन्या पर्यावरणपूरक पर्यायांकडे वळत आहेत. याच दिशेने मोठे पाऊल उचलत Suzuki Motor Corporation ने 2025 Japan Auto Show मध्ये आपल्या लोकप्रिय स्कूटर Access 125 चा CNG व्हेरिएंट सादर केला आहे. ही स्कूटर पेट्रोल आणि CNG, दोन्हीवर चालणारी बाय-फ्यूल मॉडेल आहे. कंपनीचा दावा आहे की, हे मॉडेल केवळ परवडणारे नाही तर मायलेज, डिझाईन आणि सेफ्टीच्या बाबतीतही आधीपेक्षा अधिक सुधारित आहे.

डिझाईन आणि लुक्स- Suzuki Access 125 CNG चे डिझाईन क्लासिक Access सारखेच ठेवण्यात आले आहे, मात्र त्यात आधुनिकता आणली आहे. स्कूटरला ग्रीन-निळ्या ड्युअल-टोन ग्राफिक्स, CNG बॅजिंग, आणि डिजिटल-एनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे, ज्यात पेट्रोल आणि CNG दोन्ही टाक्यांची माहिती दिसते. तसेच, LED हेडलॅम्प, क्रोम फिनिशिंग, आणि प्रिमियम सीट क्वालिटी यामुळे हा स्कूटर अधिक आकर्षक आणि इको-फ्रेंडली दिसतो.

इंजिन आणि परफॉर्मन्स- या स्कूटरमध्ये पूर्वीप्रमाणेच 125cc एअर-कूल्ड इंजिन आहे, पण त्यात आता CNG फ्युएल सिस्टिम जोडण्यात आली आहे. ही बाय-फ्युएल टेक्नॉलॉजी असल्यामुळे स्कूटर पेट्रोल आणि CNG दोन्हीवर चालते.

कंपनीच्या माहितीनुसार, CNG मोडमध्ये टॉप स्पीड किंचित कमी असेल, पण मायलेजमध्ये मोठी वाढ होईल. सुजुकीचा दावा आहे की, Access 125 CNG एका किलो गॅसमध्ये 60 ते 70 किलोमीटरपर्यंत धावेल, जे पेट्रोल मॉडेलपेक्षा 30-40% अधिक मायलेज आहे.

सेफ्टी आणि टेक्नॉलॉजी- सेफ्टीच्या बाबतीत सुजुकीने विशेष काळजी घेतली आहे. स्कूटरमध्ये ड्युअल-फ्युएल स्विचिंग सेफ्टी सिस्टिम आहे, जी फ्युएल मोड बदलताना गॅस लीक होण्यापासून संरक्षण करते. याशिवाय, लीक डिटेक्शन सेंसर आणि ऑटो कट-ऑफ वॉल्व्ह सारख्या तंत्रज्ञानामुळे कोणत्याही धोका स्थितीत फ्युएल सप्लाय आपोआप बंद होतो. टेक्नॉलॉजीच्या बाबतीत, Access 125 CNG मध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, आणि USB चार्जिंग पोर्ट सारखी आधुनिक वैशिष्ट्ये दिली आहेत.

भारतामध्ये कधी येणार? Suzuki Access 125 CNG भारतात 2026 च्या सुरुवातीपर्यंत लॉन्च होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला हे मॉडेल दिल्ली, मुंबई, पुणे आणि अहमदाबाद यांसारख्या शहरांमध्ये उपलब्ध होईल, जिथे आधीपासूनच CNG स्टेशनची चांगली सुविधा आहे. याची किंमत अद्याप समोर आलेली नाही, मात्र सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या Access 125 च्या आसपास किंमत असू शकते.

















