Nissan देणार Maruti Ertiga आणि Kia ला टक्कर; कमी किमतीत लाँच करणार 7 सीटर कार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 11:58 AM2022-11-16T11:58:09+5:302022-11-16T12:17:56+5:30

सध्या अनेकांना कुटुंबीयांसाठी 7 सीटर कार खरेदी करायची असते. पण बजेटमुळे अनेकांचे स्वप्न पूर्ण होत नाही. पण, आता निसान कंपनी कमी किंतीतील कार लाँच करणार आहे.

सध्या अनेकांना कुटुंबीयांसाठी 7 सीटर कार खरेदी करायची असते. पण बजेटमुळे अनेकांचे स्वप्न पूर्ण होत नाही.निसान कंपनीनेही मारुती सुझुकी एर्टिगा आणि किया केरेन्स सारख्या वाहनांशी स्पर्धा करण्यासाठी लवकरच आपली 7 सीटर कार लाँच करण्याची तयारी सुरू केली आहे. निसान आपल्या मॅग्नाइट कारचे 7 सीटर मॉडेल लॉन्च करू शकते.

एका अहवालानुसार, ही आगामी निसार कार मॅग्नाइट प्रमाणेच CMF-A प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल.

Nissan Magnite 7 सीटर मॉडेलमध्ये 1.0 लीटर 3 सिलेंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन 1.0 लीटर 3 सिलेंडर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोलसह पर्यायासह दिसू शकते.

Nissan Magnite बाजारात कमी किमतीत आकर्षक लूकसह आली आहे, म्हणूनच ही SUV कार अनेकांच्या पसंतीस पडली आहे. मॅग्नाइटच्या 5 सीटर मॉडेलप्रमाणे हा प्रकार देखील ग्राहकांमध्ये आपले स्थान निर्माण करू शकेल.

Nissan Magnite 7 Seater ची किंमत 10 लाख रुपयांपर्यंत असू शकते.ही कार ग्राहकांच्या पसंतीस उतरेल अस कंपनीने म्हटले आहे.

गेल्या काही दिवसापासून ज्या कंपन्या 5 सीटर कार बाजारात लाँच करत आहे, त्याच कारमध्ये बदल करुन कंपन्या आता ७ सीटर कार लाँच करत आहेत.

पहिल्यांदा MG हेक्टरने 5 सीटर कार लाँच केली, यानंतर कंपनीने या कारचे MG हेक्टर प्लस मॉडेल देखील ग्राहकांसाठी लॉन्च केले. यात 7 सीटरची सुविधा दिली.

Nissan कंपनीने या संदर्भात अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण लवकरच ही कार लाँच करणार असल्याची शक्यता आहे.