₹6 लाखांच्या 'या' SUV वर ₹1.20 लाखांची सूट; टाटा पंचशी थेट स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 14:24 IST2026-01-05T14:19:24+5:302026-01-05T14:24:00+5:30

5-स्टार Global NCAP सेफ्टी रेटिंगसह मिळतात अनेक आधुनिक फीचर्स

भारतीय बाजारात कमी बजेटमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग असलेल्या कार्सना मोठी मागणी आहे. याच श्रेणीत येणारी Nissan ची कॉम्पॅक्ट SUV Magnite सध्या चर्चेत आहे. मॅग्नाइटचा थेट मुकाबला Tata Punch सोबत होत असून, नववर्षाच्या निमित्ताने कंपनीने या SUV वर तब्बल ₹1.20 लाखांपर्यंतचा लाभ जाहीरकेला आहे.

निसानने 1 जानेवारीपासून मॅग्नाइटच्या किमतींमध्ये 3 टक्के वाढ जाहीर केली होती. मात्र, आता मोठ्या डिस्काउंट ऑफरमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कंपनीच्या माहितीनुसार, जर मॅग्नाइट 22 जानेवारीपूर्वी खरेदी केली, तर ग्राहकांना एकूण ₹1.20 लाखांपर्यंतचे फायदे मिळू शकतात.

सध्या निसानच्या अधिकृत वेबसाइटनुसार मॅग्नाइटची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹5.61 लाख इतकीच ठेवण्यात आली आहे. 3 टक्के दरवाढ लागू झाल्यास ही किंमत ₹5.78 लाखांपासून सुरू होईल. मात्र, उपलब्ध सूटीमुळे दरवाढीचा परिणाम मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. या ऑफरमध्ये नेमके कोणते लाभ (कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस किंवा कॉर्पोरेट ऑफर) समाविष्ट आहेत, याबाबत कंपनीने अद्याप स्पष्ट माहिती दिलेली नाही.

कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये मॅग्नाइटची स्पर्धा Renault Kiger, Hyundai Venue, Maruti Suzuki Fronx आणि Kia Sonet यांच्याशी आहे. मात्र, मॅग्नाइटचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिला Global NCAP कडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. कमी किमतीत जास्त सुरक्षितता देणाऱ्या कार्समध्ये मॅग्नाइटचा समावेश होतो. सेफ्टी फीचर्समध्ये 6 एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ESC), हिल स्टार्ट असिस्ट, ABS आणि EBD यांसारख्या आधुनिक प्रणालींचा समावेश आहे.

निसान मॅग्नाइट ही सब-कॉम्पॅक्ट SUV असली तरी, ती पॉवरफुल परफॉर्मन्स देते. यात दोन पेट्रोल इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. पहिले- 1.0 लीटर नॅचरल अस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आणि 1.0 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन (अधिक पॉवरसाठी). याशिवाय, आता मॅग्नाइटमध्ये फॅक्ट्री-फिटेड CNG किटचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे. CNG व्हेरिएंटमध्ये ही SUV सुमारे 24 किमी/किग्रॅ पर्यंतचे मायलेज देण्यास सक्षम आहे. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक, दोन्ही गिअरबॉक्स पर्याय मॅग्नाइटमध्ये उपलब्ध आहेत.