Most Searched Cars on Google 2021: हॅचबॅक, सेदानचे दिवस गेले? जाणून घ्या यंदा गुगलवर सर्वाधिक सर्च झालेल्या कार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 05:09 PM2021-12-30T17:09:32+5:302021-12-30T17:14:17+5:30

Most Searched Cars on Google 2021: कोरोनामुळे आणि चिपच्या संकटामुळे वाहन उद्योगाने वेग पकडला नसला तरी या वर्षी रेकॉर्डब्रेक एसयुव्ही, मिनी-कॉम्पॅक्ट एसयुव्हींचे लाँचिंग झाले. यामुळे कंपन्यांनी पुढील वर्षासाठी कंबर कसलेली आहे.

नववर्षात गाडी घेताना तुम्हाला गुगल खूप मदत करणार आहे. कारण या वर्षात कोणत्या गाड्या सर्वाधिक सर्च केल्या गेल्या हे तुम्हाला गुगलने सांगितले आहे. देशात कोणच्या गाड्यांचे वारे वाहत आहे, कोणत्या गाड्यांना सर्वाधिक पसंती दिली जात आहे, हे समजून घेण्यास तुम्हाला याची मदत मिळणार आहे.

कोरोनामुळे आणि चिपच्या संकटामुळे वाहन उद्योगाने वेग पकडला नसला तरी या वर्षी रेकॉर्डब्रेक एसयुव्ही, मिनी-कॉम्पॅक्ट एसयुव्हींचे लाँचिंग झाले. यामुळे कंपन्यांनी पुढील वर्षासाठी कंबर कसलेली आहे.

जानेवारी ते नोव्हेंबरमध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेली कार ही किया सेल्टॉस आहे. दर महिन्याला ८ लाख लोकांनी ही कार सर्च केली आहे. ही एसयुव्ही असली तरी अन्य सर्वाधिक सर्च झालेल्या कार या हॅचबॅक आणि सेदान कार आहेत. म्हणजेच हॅचबॅक आणि सेदान कारची लोकांमध्ये असलेली क्रेझ आजही तेवढीच आहे.

गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या कारमध्ये दुसऱ्या क्रमांकावर टाटाची फाईव्ह स्टार कार टाटा अल्ट्रोझ आहे. ही कंपनीची दुसरी फाईव्ह स्टार सेफ्टीची प्रमिअम हॅचबॅक कार आहे.

यानंतर तिसऱ्या क्रमांकावर सर्च करण्यात आलेली कार ही कॉम्पॅक्ट सेदान स्विफ्ट डिझायर ही आहे. दर महिन्याला ४.५ लाख लोकांना सर्च केले. डिझायर पुढील वर्षी सीएनजीमध्ये येण्याची चिन्हे आहेत.

यानंतर चौथ्या क्रमांकावर देशात सेदान कारना तुफान लोकप्रियता मिळवून देणारी होंडा सिटी आहे. ही सेदान कारच्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक खपाची कार आहे. होंडा सिटीला महिन्याला ३.६ लाख लोकांना सर्च केले. या कारला देखील ग्लोबल एनकॅपमध्ये ५ स्टार रेटिंग मिळाले आहे.

पाचव्या क्रमांकावर टाटाची एन्ट्री लेव्हल हॅचबॅक कार टाटा टियागो आहे. या कारला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 4-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. टियागोचे मायलेजही चांगले आहे. कंपनीने ही कार डिझेल व्हेरिअंट बंद केले असले तरी पुढील वर्षात सीएनजीमध्ये आणण्याची तयारी केली आहे.

सहाव्य़ा क्रमांकावर Maruti Suzuki Alto 800 आहे. महिन्याला तीन लाखांहून अधिक युजरनी अल्टो कार सर्च केली आहे. अल्टोचे २०२२ मध्ये नेक्स्ट मॉडेल लाँच केले जाणार आहे.