MIHOS EV: हतोड्याचे घाव घाला...स्कूटरला काहीच होणार नाही; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV Scooter

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 09:47 PM2023-01-12T21:47:56+5:302023-01-12T21:50:31+5:30

MIHOS EV: दमदार बॉडीसह या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये लेटेस्ट फीचर्स देण्यात आले आहेत.

इलेक्ट्रिक टू-व्हीलर मेकर WardWizard Innovations & Mobility कंपनीने ऑटो एक्सपोच्या दुसऱ्या दिवशी आपली नवीकोरी हाय स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर MIHOS लॉन्च केली आहे. कंपनीने या स्कूटरला बनवण्यासाठी पॉली मटेरियलचा वापर केला आहे.

त्यामुळे या स्कूटरवर हातोड्याचे घाव घातले, तरीदेखील स्कूटरच्या बॉडीला काहीही होणार नाही, असा कंपनीचा दावा आहे. विशेष म्हणजे, कंपनी Joy e-Bikes नावाने सध्या भारतीय बाजारात आपल्या इलेक्ट्रिक बाईक्स विकते.

कंपनीने सांगितले की, या स्कूटरचा व्हीलबेस 1360mm आहे. तसेच, यात ऑल LED लायटिंग सेटअप दिला आहे. कंपनीने या स्कूटरला(ब्लू, सॉलिड ब्लॅक ग्लॉसी, सॉलिड यलो ग्लॉसी आणि पर्ल व्हाइट) कलर पर्याय दिले आहेत. याशिवाय, चालकाच्या सुरक्षेसाठी या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अॅडव्हान्स टेक्नोलॉजी आणि यूजर फ्रेंडली फीचर्ससोबत साउंड सिम्युलेटरदेखील दिला आहे.

कंपनीने या स्कूटरला रेट्रो स्टाइलमध्ये तयार केले आहे. तसेच यात रुंद आणि लांब सीट देण्यात आले आहे. चालकला आरामदायक प्रवास मिळावा, यासाठी या स्कूटरमध्ये टेलीस्कोपिक सस्पेंशन सेटअपसोबतच रिअरमध्ये मोनो रिव्हर्सिबल स्प्रिंग सस्पेंशन असेल.

MIHOS भारतीय रस्त्यांवर आरामात चालावी यासाठी याचा ग्राउंड क्लिअरं 175 मिमी ठेवण्यात आला आहे. या स्कूटरणध्ये साइड स्टँड सेंसर आणि हायड्रोलिक कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम (सीबीएस) असेल. तसेच रिव्हर्स मोड, GPS ट्रॅकिंग सिस्टीम, अँटी थेफ्ट अलार्मसारखे फीचर्स असतील.

MIHOS स्कूटर एका सिंगल चार्जवर 100 किलोमीटरची रेंज देईल. तसेच, ही स्कूटर फक्त 7 सेकंदात 0-40 किमी प्रति तासांचा वेग पकडू शकते. MIHOS मध्ये 74V40Ah ली-आयन आधारित बॅटरी पॅक दिला आहे. विशेष म्हणजे, पहिल्या पाचशे ग्राहकांसाठी स्कूटरची किंमत 1.49 लाख रुपये असेल.