शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मायक्रोमॅक्स ऑटोमोबाईल क्षेत्रात उतरली; पहिली 'देशी' इलेक्ट्रीक बाईक आली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 6:24 PM

1 / 8
मायक्रोमॅक्सच्या मालकाने ऑटोमोबाईल क्षेत्रात नशीब आजमविण्याचे ठरविले आहे.
2 / 8
आज देशातील पहिली इलेक्ट्रीक बाईक लाँच करण्यात आली. Revolt RV 400 असे या बाईकचे नाव असून 25 जूनपासून अॅमेझॉन आणि कंपनीच्या वेबसाईटवर बाईक बुक करता येणार आहे.
3 / 8
मायक्रोमॅक्स या भारतीय मोबाईले कंपनीचे मालक राहुल शर्मा यांनी ही कंपनी सुरु केली आहे. कंपनीने अद्याप या बाईकची किंमत जाहीर केली नसून 1 हजार रुपयांच्या टोकनमध्ये ही बाईक बुक करता येणार आहे.
4 / 8
पहिल्या चार महिन्यांमध्ये Revolt Intellicorp कंपनी या बाईकची विक्री दिल्ली-NCR, पुणे, बंगळुरू, हैदराबाद, नागपूर, अहमदाबाद आणि चेन्नईमध्ये करण्यात येणार आहे.
5 / 8
Revolt RV 400 या बाईकचा जास्तीतजास्त वेग 85 किमी आहे. तर, ARAI नुसार ही बाईक एका चार्जिंगमध्ये 156 किमी धावते. या बाईकमध्ये काढता येणारी बॅटरी देण्यात आली आहे.
6 / 8
या बाईकमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस (Artificial Intelligence) चा वापर करण्यात आला आहे. यामुळे ही बाईक चालकाचा रायडींग पॅटर्न नोंद करणार आहे.
7 / 8
याशिवाय बाईकची रेंज, रायडिंग स्टाईल आणि बिघाडाची माहिती देणार आहे.
8 / 8
याशिवाय ऑल-LED लाइटिंग, फुल्ली डिजिटल डॅश आणि 4जी कनेक्टिव्हीटी देण्यात आली आहे.
टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनbikeबाईक