शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

MG Motors: 'या' 4 लग्झरी गाड्यांना ग्राहकांची मोठी पसंती, आतापर्यंत 1 लाख गाड्यांची रेकॉर्डब्रेक विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 3:04 PM

1 / 10
ब्रिटीश कार निर्माता कंपनी MG ने भारतात 1 लाख वाहनांची विक्री करण्याचा मैलाचा दगड रचला आहे. या टप्प्यावर पोहोचण्यासाठी कंपनीला 3 वर्षे लागली. कंपनीने 2019 मध्ये हेक्टरसह भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला होता. हेक्टरच्या यशानंतर कंपनीने आपला पोर्टफोलिओ सतत वाढवला. हेक्टर व्यतिरिक्त, कंपनी भारतात ZS EV, प्रीमियम SUV Gloster आणि कॉम्पॅक्ट SUV Aster विकत आहे.
2 / 10
एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा म्हणाले, “भारतीय ऑटोमोटिव्ह क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि स्मार्ट मोबिलिटी सोल्यूशन्सद्वारे शाश्वत भविष्य निर्माण करण्यासाठी आमचे समर्पण दिवसेंदिवस अधिक दृढ होत आहे. सध्या, कंपनीचा गुजरातमधील हलोल येथे एक प्लांट आहे ज्याची वार्षिक उत्पादन क्षमता 80,000 वाहने आहे. सुमारे 2,500 कर्मचारी येथे काम करतात.
3 / 10
MG Hector: कंपनीच्या या कारला कीलेस एंट्री, पुश बटण स्टार्ट, ऑटो होल्डसह इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, स्टीयरिंग व्हीलसाठी टेलिस्कोपिक ऍडजस्टमेंट आणि क्रोम फिनिश डोअर हँडल्स देखील मिळतात. सनरूफ व्यतिरिक्त, ही सर्व वैशिष्ट्ये फक्त शाईन ट्रिमच्या पेट्रोल-सीव्हीटी प्रकारात उपलब्ध आहेत. यामध्ये कंपनीने 17 इंची अलॉय व्हील्सचा वापर केला आहे, तर टॉप मॉडेलमध्ये 18 इंचाची चाके देण्यात आली आहेत.
4 / 10
कंपनीने हे नवीन मॉडेल हवाना ग्रे कलरमध्ये सादर केले आहे. हे पेट्रोल आणि डिझेल दोन्ही पर्यायांमध्ये खरेदी केले जाऊ शकते. त्याच्या पेट्रोल व्हर्जनमध्ये कंपनीने 1.5 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन वापरले आहे जे 143hp पॉवर जनरेट करते. दुसरीकडे, डिझेलमध्ये 2.0-लिटर इंजिन आहे, जे 170hp पॉवर जनरेट करते. ही दोन्ही इंजिने 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जुळलेली आहेत.
5 / 10
MG Astor: ही कंपनीच्या इलेक्ट्रिक SUV ZS चे पेट्रोल व्हर्जन आहे. कंपनीने MG Astor 1.5 लिटर नॅचरली एस्पिरेटेड इंजिन (110hp) आणि 1.3 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन (140hp पॉवर) सह सादर केली आहे. याचे 1.3 लीटर इंजिन 6 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येते. तर 1.5 लीटर इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 8-स्टेप CVT ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
6 / 10
MG Astor मध्ये वापरण्यात आलेल्या या विशेष तंत्रज्ञानामध्ये 360 कॅमेरा वापरण्यात आला आहे, जो वाहन चालवताना विविध वैशिष्ट्ये देईल. यामध्ये अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन कीपिंग असिस्ट, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, लेन डिपार्चर वॉर्निंग, रीअर ड्राइव्ह असिस्ट (RDA), लेन डिपार्चर प्रिव्हेंशन, इंटेलिजेंट हेडलॅम्प कंट्रोल (IHC) आणि स्पीड असिस्ट सिस्टीम या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
7 / 10
MG Gloster: MG Gloster मध्ये दोन डिझेल इंजिन देण्यात आले आहेत. यात 2.0-लीटर टर्बो डिझेल आणि 2.0-लीटर ट्विन-टर्बो डिझेल इंजिन मिळतात. पहिले इंजिन 163 PS पॉवर आणि 375 Nm पीक टॉर्क जनरेट करते, तर दुसरे इंजिन 218 PS पॉवर आणि 480 Nm पीक टॉर्क जनरेट करते. त्यासोबत 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय आहे. 2.0-लीटर टर्बो-डिझेल इंजिन मागील-चाक-ड्राइव्ह सेटअपसह ऑफर केले जाते, तर 2.0-लीटर ट्विन-टर्बो डिझेल मोटरला चार-चाक ड्राइव्ह मिळते.
8 / 10
SUV ला 12.3-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम Android Auto, Apple CarPlay वैशिष्ट्यांसह मिळते. यात मोठे पॅनोरामिक सनरूफ, तीन-झोन क्लायमेट कंट्रोल, लेव्हल-1 ADAS (प्रगत ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम) सारखी वैशिष्ट्ये देखील आहेत. सुरक्षेसाठी, यात अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, पार्क असिस्ट, ऑटो इमर्जन्सी ब्रेकिंग आणि लेन कीप असिस्ट यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
9 / 10
MG ZS EV: या इलेक्ट्रिक कारमध्ये पूर्वीपेक्षा मोठी 50.3kWH बॅटरी आहे. पूर्वी यात 44.7kWh बॅटरी युनिट मिळत असे. नवीन बॅटरी 143bhp पॉवर आणि 353Nm टॉर्क जनरेट करते. ही कार केवळ 8.5 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग गाठण्याचा दावा कंपनी करते. नवीन ZS इलेक्ट्रिकला एका चार्जवर 461km ची रेंज देण्याचा दावा करण्यात आला आहे.
10 / 10
जुन्या मॉडेलने पूर्ण चार्ज केल्यावर 419km पोहोचवण्याचा दावा केला होता. नवीन ZS EV 2022 मध्ये 10.1-इंचाची HD टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, Android आणि Apple CarPlay कनेक्टिव्हिटी आहे. ZS EV ला आरामासाठी मागील एअर कंडिशनिंग व्हेंट देखील मिळतात. MG मोटरने 2020 मध्ये ZS EV सादर केली होती.
टॅग्स :MG Motersएमजी मोटर्सAutomobileवाहन