‘एमजी हेक्टर’ भारतात लॉन्च; टाटाच्या हॅरिअरपेक्षाही स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 08:08 PM2019-06-27T20:08:55+5:302019-06-27T20:17:50+5:30

एमजी (मॉरिस गॅरेज) मोटर्स इंडियाने त्यांची पहिली एसयूव्ही एमजी हेक्टर आज लाँच केली. इंटरनेट कार असलेल्या या एसयुव्हीची किंमत टाटाच्या हॅरिअरपेक्षाही स्वस्त ठेवल्याने मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे.

भारताची पहिली इंटरनेट कार एमजी हेक्टर गेल्या महिन्यात दाखविण्यात आली होती. तसेच आगाऊ बुकिंगही सुरू करण्यात आले होते. मात्र, किंमत गुलदस्त्यात ठेवण्यात आली होती. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून या कारची डिलीव्हरी सुरू करण्यात येणार आहे.

हेक्टरसोबत ग्राहकांना 'एमजी शिल्ड' हे वाहन मालकीचे पॅकेज देण्यात येणार आहे. यामध्ये मालकांना अमर्याद किमी पाच वर्षांच्या काळासाठी वॉरंटी दिली जाणार आहे.

अन्य वॉरंटीसह पाच सर्व्हिस मोफत देण्यात येणार आहेत. तसेच मेन्टेनन्स प्लॅनही देण्यात आले आहेत.

आता पर्यंत कंपनीने 10 हजार बुकिंग नोंदविली आहेत. सध्या कंपनीची 120 आऊटलेट असून ती पुढील तीन महिन्यांत 250 करण्यात येणार आहेत.

ही एसयुव्ही 11 प्रकारात मिळणार असून पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन सुपरची एक्स-शोरूम किंमत 12.18 लाख ठेवण्यात आली आहे. जी टाटाच्या हॅरिअरपेक्षा जवळपास 70 हजारांनी कमी आहे.

पेट्रोल हायब्रिड कारची किंमत 13.58 लाखांपासून सुरू होते. पेट्रोलच्या अॅटोमॅटीक मॉडेलची किंमत 15.28 लाखांपासून सुरू होते.

डिझेल एमटीची किंमत 13.18 लाख ते 16.88 लाख रुपये एक्स शोरुम ठेवण्यात आली आहे.

हेक्टरची किंमत टाटा हॅरिअरपेक्षा 80 हजार, जीप कंपासपेक्षा तब्बल 3.5 लाखांनी कमी ठेवण्यात आली आहे.