सणासुदीच्या काळात Maruti कडून शानदार ऑफर्स; 'या' गाड्यांवर दिली जातेय मोठी सूट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 15:05 IST2023-10-10T14:58:47+5:302023-10-10T15:05:39+5:30
Discount Offers On Maruti Cars: ऑफरमध्ये एक्सचेंज बोनस, रोख सवलत आणि कॉर्पोरेट फायदे समाविष्ट आहेत.

सणासुदीच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मारुती सुझुकीने उत्तम ऑफर्स आणल्या आहेत. कंपनी ऑक्टोबर महिन्यात आपल्या अनेक मॉडेल्सवर भरघोस सूट देत आहे, या कारमध्ये Alto K10, Wagon R, Brezza, Swift, S-Presso आणि Celerio सारख्या मॉडेल्सचा समावेश आहे. ऑफरमध्ये एक्सचेंज बोनस, रोख सवलत आणि कॉर्पोरेट फायदे समाविष्ट आहेत.
Maruti Alto K10
Maruti Alto K10 च्या सीएनजी व्हेरिएंटवर 68,000 रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे. तर पेट्रोल व्हेरिएंटवर 53,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.
Maruti Brezza
Maruti Brezza मॉडेल्सच्या पेट्रोल व्हेरिएंटवर (MT आणि AMT) 45,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. CNG व्हेरिएंटवर 20,000 रुपयांपर्यंत सूट आहे.
Maruti S-Presso
Maruti S-Presso च्या सीएनजी व्हेरिएंटवर 68,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे, तर पेट्रोल (MT आणि AMT) वर 51,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.
Maruti Wagon R
Maruti Wagon R च्या सर्व पेट्रोल व्हेरिएंटवर 46,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. तसेच, सीएनजी व्हेरिएंटवर 58,000 रुपयांपर्यंत सवलत ऑफर आहे.
Maruti Celerio
Maruti Celerio च्या सर्व पेट्रोल व्हेरिएंटवर 51,000 रुपयांपर्यंत सूट आहे. तर, सीएनजी व्हेरिएंटवर 68,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.
Maruti Swift
Maruti Swift च्या पेट्रोल व्हेरिएंटवर 47,000 रुपयांपर्यंत सूट आहे, तर सीएनजी व्हेरिएंटवर केवळ 33,000 रुपयांपर्यंत सूट आहे.
Maruti Baleno
देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक Maruti Baleno आहे. या कारच्या सर्व पेट्रोल व्हेरिएंटवर 40,000 रुपयांपर्यंतची सूट ऑफर उपलब्ध आहे. तसेच, सीएनजी व्हर्जनवर 55,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.