आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 11:26 IST2025-07-09T11:01:25+5:302025-07-09T11:26:22+5:30

Mahindra XUV 3XO RevX: यात 6 एअरबॅग्ज, हिल होल्ड कंट्रोल अन् इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोलसह 35 सुरक्षा फिचर्स मिळतात.

Mahindra XUV 3XO RevX: देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने त्यांच्या सर्वात स्वस्त XUV 3XO च्या मॉडेलच्या लाइनअपचा विस्तार करत 3 नवीन ट्रिम्स लॉन्च केले आहेत. कंपनीने या नवीन व्हेरिएंटला 'XUV 3XO RevX' असे नाव दिले आहे. या नवीन व्हेरिएंटची किंमत 8.94 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 12.99 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते.

कंपनीने नवीन '3XO RevX' मध्ये काही कॉस्मेटिक बदल केले आहेत, ज्यामुळे ते सध्याच्या व्हेरिएंटपेक्षा थोडे चांगले आणि आकर्षित दिसतात. याशिवाय, या SUV च्या बॉडीवर 'RevX' बॅजिंग देण्यात आले आहे, जे याला इतर व्हेरिएंटपेक्षा वेगळे बनवते.

XUV 3XO RevX मध्ये काय खास आहे? कंपनीने हे नवीन व्हेरिएंट 3 वेगवेगळ्या ट्रिम्समध्ये (RevX M, RevX M(O) आणि RevX A) लॉन्च केले आहे. हे नवीन व्हेरिएंट फक्त पेट्रोल इंजिन पर्यायात येते, त्यात डिझेल इंजिनचा पर्याय नाही. या तिन्ही ट्रिम्सची किंमत, त्याच्या फीचर्सनुसार बदलते. या तिन्ही एसयुव्ही मॅन्युअल ट्रान्समिशन आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांसह येतात.

RevX च्या सर्व व्हेरिएंट्सची किंमत- RevX M आणि RevX M (O) व्हेरिएंटमध्ये 1.2-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन मिळते, जे नियमित व्हेरिएंट MX2 Pro आणि MX3 ट्रिम्सपेक्षा कमी आहे. याशिवाय, RevX A व्हेरिएंट फक्त 1.2-लिटर TGDi इंजिनसह येतो, जो नियमित मॉडेल AX5 आणि AX7 दरम्यान आहे. या व्हेरिएंटमध्ये कंपनीने काही खास फिचर्स दिले आहेत, जी तुम्हाला कमी किमतीत चांगल्या सुविधा देतात.

REVX M: 8.94 लाख- या व्हेरिएंटमध्ये कंपनीने 1.2-लिटर क्षमतेचे (mStallion TCMPFi) पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन 82 kW पॉवर आणि 200 Nm टॉर्क जनरेट करते. याच्या बोल्ड एक्सटीरिअरमध्ये बॉडी-कलर ग्रिलसह एक आकर्षक पूर्ण-रुंदीचे LED DRL, R16 ब्लॅक व्हील कव्हर्स आणि स्पोर्टी ड्युअल-टोन रुफ मिळते.

केबिनमध्ये तुम्हाला आलिशान ब्लॅक लेदर सीट्स, स्टीअरिंग-माउंटेड कंट्रोल्ससह 26.03 सेमी इन्फोटेनमेंट सिस्टम आणि इमर्सिव्ह केबिन अनुभवासाठी 4-स्पीकर ऑडिओ सेटअप मिळतो. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या व्हेरिएंटमध्ये मानक 35 सुरक्षा फिचर्स मिलतात. शिवाय, 6 एअरबॅग्ज, हिल होल्ड कंट्रोल (HHC) सह इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ESC) आणि सर्व चाकांवर 4 डिस्क ब्रेक समाविष्ट आहेत.

REVX M(O): 9.44 लाख- या व्हेरिएंटमध्ये मागील व्हेरिएंटची सर्व वैशिष्ट्ये आणि पॉवरट्रेन पर्याय आहेत. तथापि, दोन्ही व्हेरिएंटच्या किमतीत सुमारे 50,000 रुपयांचा फरक आहे. त्या बदल्यात ग्राहकांना सिंगल-पॅनल सनरुफसारख्या सुविधा मिळतात. हे ड्रायव्हिंग दरम्यान केबिन अनुभवाला थोडे अधिक प्रीमियम फील देते.

REVX A: 11.79 लाख - या व्हेरिएंटमध्ये, कंपनीने 1.2 लिटर क्षमतेचे (mStallion TGDi) इंजिन दिले आहे. हे इंजिन 96 किलोवॅट पॉवर आणि 230 एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येते. कंपनीचा दावा आहे की त्यात प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत, जे त्याचा केबिन अनुभव आणखी चांगला बनवतात.

यात बॉडी-कलर फ्रंट ग्रिल, स्पेशल बॅजिंग, आर16 पेंटेड ब्लॅक अलॉय आणि ड्युअल-टोन रूफ आहे. पॅनोरॅमिक सनरूफ, लेदरेट सीट्स, ड्युअल-टोन इंटीरियर, ऑटो-डिमिंग इन साइड रियर-व्ह्यू मिरर सारखी फीचर्स देण्यात आली आहेत. याशिवाय, ड्युअल एचडी स्क्रीन (एक 26.03 सेमी इन्फोटेनमेंट आणि दुसरे 26.03 सेमी डिजिटल क्लस्टर) देण्यात आले आहेत. याशिवाय, त्यात अॅड्रेनॉक्स कनेक्ट, बिल्ट-इन अलेक्सा, ऑनलाइन नेव्हिगेशन आणि वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटीची सुविधा देखील आहे.