Lucid Air Dream Electric Car : 'या' इलेक्ट्रीक सेडानसमोर Tesla ही फेल; 836kms ची ड्रायव्हिंग रेंज, २० मिनिटांत होते फुल चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 04:07 PM2021-10-05T16:07:40+5:302021-10-05T16:14:04+5:30

Electric Cars : सध्या जगभरातील अनेक जण आता इलेक्टीक कार्सच्या दिशेनं वळताना दिसत आहे. त्यामुळे आता कंपन्यांमध्येही स्पर्धा लागल्याचं दिसून येतंय.

सध्या जगभरात Electric Cars चं क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दरम्यान, अनेक कंपन्याही आता याकडे वळू लागल्या आहे. उत्तम रेंज आणि त्यासोबतच उत्तम फीचर्स याकडे कंपन्या प्रामुख्यानं ग्राहकांचा कल असल्याचंही दिसत आहे.

जगभरात इलेक्ट्रीक मोबिलिटीच्या दिशेने सातत्याने नवनवीन प्रयोग करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे. सध्या अनेक इलेक्ट्रीक कार उत्पादक कंपन्या सातत्यानं ड्रायव्हिंग रेज कशी वाढवता येईल याकडे लक्ष देत आहेत.

आतापर्यंत, टेस्ला या अमेरिकन इलेक्ट्रीक कार कंपनीचे नाव या प्रकरणात सर्वात वर आहे. परंतु आता अमेरिकेतील इलेक्ट्रीक वाहन उत्पादक असलेल्या Lucid Motors ने आपली Air Dream Edition इलेक्ट्रीक सेडान कार सादर केली आहे आणि ही कार ड्रायव्हिंग रेंजच्या बाबतीत टेस्लालाही मागे टाकते.

दरम्यान, कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार सिंगल चार्जमध्ये ही कार 830 किमीची रेंज देते. कारची ही रेंज युएस एनवायरमेंट प्रोटेक्शन एजन्सीनं प्रामाणित केलं आहे. या कारची रेंज Tesla Model S Long Range पेक्षा 185 किमीनं अधिक आहे. Tesla Model S Long Range ही कार 651 किमीची रेंज देते.

किंमतीबाबत सांगायचं झालं तर या इलेक्ट्रीक सेडान कारची किंमत 169000 डॉलर्स इतकी निश्चित करण्यात आली आहे. तर Lucid Air या सेडान कारच्या तुलनेत ही 74000 डॉलर्स अधिक आहे.

कंपनीनं या कारमध्ये 900V क्षमतेचं बॅटरी पॅक दिलं आहे. हे BMS या तंत्रज्ञानासह येतं. हे नवं तंत्रज्ञान ड्रायव्हिंग एक्सपिरिअन्ससह उत्तम ड्रायव्हिंग रेंजही देण्याचं काम करतं.

या कारच्या अन्य एलिमेंट्स बद्दल सांगायचं झालं तर त्याची पॉवरफुल इलेक्ट्रीक मोटर आणि एअरोडायनॅमिक डिझाईन त्याच्या ड्रायव्हिंग रेंजला अधिक उत्तम बनवण्याचं काम करतात. या कारची क्लिनशीट डिझाईन ड्रॅग कमी करण्यासाठी आणि कमी बॅटरी संपवण्यासाठी मदत करते.

कंपनीनं केलेल्या दाव्यानुसार ही कार केवळ 20 मिनिटे चार्ज केल्यानंतर 480 किमीची रेंज देते. पिकअपसाठीही ही इलेक्ट्रीक सेडान अतिशय खास आहे. ही कार केवळ 2.5 सेकंदांमध्ये 0-100 किलोमीटर प्रतितासाचा वेग पकडते.

फीचर्सबद्दल सांगायचं झालं तर ही कार त्यातही अतिशय उत्तम आहे. याच्या केबिनमध्ये 34 इंचाचे 5k ग्लॉस कॉकपिट डिस्प्ले देण्यात आले आहेत. याशिवाय 21 स्पीकर्स. Alexa इनबिल्ट वॉईस कमांड आणि OTA सारखे अपडेट्स या कारला अधिक आकर्षक बनवतात.

Lucid Air Dream Edition ही इलेक्ट्रीक कार दोन व्हेरिअंट्स आणि परफॉर्मन्समध्ये येते. एपीएद्वारे 836 किमीची रेंज कंपनीच्या ड्रीम एडिशनमध्ये मिळते. यामध्ये 19 इंचाचे व्हिल्स देण्यात आले आहेत.

शिवाय ल्युसिड एअर ड्रीम एडिशन परफॉर्मन्स व्हेरिअंटमध्ये 758 किमीची रेंज मिळते. दोन्ही कारमध्ये 21 इंचाच्या व्हिल्सचाही ऑप्शन मिळतो. परंतु त्यामुळे रेंजवर परिणाम होतो. कंपनीच्या योजनेनुसार ५०० पेक्षा कमी एअर ड्रीम एडिशन इलेक्ट्रीक लक्झरी कारचं उत्पादन करण्यात येणार आहे.

याचं एक ग्रँड टुरिंग व्हर्जनदेखील असेल आणि त्यामध्येही ग्राहकांना जवळपास 830 किमीची रेंज मिळते. दुसऱ्या व्हर्जनचं उत्पादन याच वर्षी सुरू होणार आहे याची किंमत १.३९ लाख डॉलर्स म्हणजे जवळपास १ कोटी रूपये असण्याची शक्यता आहे.