KTM: स्वस्तही आणि स्टायलिशही! केटीएम ३९० अ‍ॅडव्हेंचर आर भारतात लॉन्च, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 16:42 IST2026-01-29T16:37:33+5:302026-01-29T16:42:34+5:30

KTM 390 Adventure R Launched In India: केटीएम प्रेमी आणि ऑफ-रोड रायडर्ससाठी आनंदाची बातमी आहे. केटीएमने आपली सर्वात शक्तिशाली साहसी बाईक केटीएम ३९० अ‍ॅडव्हेंचर आर अधिकृतपणे लॉन्च केली आहे.

दिल्लीमध्ये केटीएम ३९० अ‍ॅडव्हेंचर आर बाईकची एक्स-शोरूम किंमत ₹३ लाख ७७ हजार ९१५ इतकी आहे. विशेष म्हणजे, ट्यूबलेस टायर्सच्या वापरामुळे ही नवी बाईक जुन्या मॉडेलपेक्षा तब्बल २० हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे.

या बाईकमध्ये ३९८.६३ सीसीचे लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन ४६ पीएस पॉवर आणि ३९ एनएम टॉर्क जनरेट करते. ६-स्पीड गिअरबॉक्समुळे वेग आणि शक्तीचे उत्तम संतुलन मिळते.

दगड आणि खडबडीत रस्ते सहज पार करण्यासाठी या बाईकला २७२ मिमी इतका उच्च 'ग्राउंड क्लिअरन्स' देण्यात आला आहे.

या बाईकचे पुढील आणि मागील सस्पेंशन तुम्ही तुमच्या गरजेनुसार अ‍ॅडजस्ट करू शकता, ज्यामुळे खडतर रस्त्यांवरही प्रवास सुखकर होतो.

ऑफ-रोडिंगसाठी या बाईकमध्ये २१-इंच फ्रंट आणि १८-इंच रिअर स्पोक व्हील्स आहेत. याला दिलेले 'नॉबी टायर्स' चिखल आणि निसरड्या रस्त्यांवर चांगली कामगिरी बजावतात.

केटीएम ३९० अ‍ॅडव्हेंचर आरमध्ये सुरक्षेसाठी ३२० मिमी फ्रंट आणि २४० मिमी रिअर डिस्क ब्रेकसह 'ऑफ-रोड ABS' देण्यात आले आहे. तसेच, ५-इंच रंगाची टीएफटी स्क्रीन असून ती फोनशी कनेक्ट करता येते. नेव्हिगेशन आणि चार्जिंगसाठी यात USB टाइप-सी पोर्टही उपलब्ध आहे.

केटीएमच्या सिग्नेचर ऑरेंज रंगातील फ्रेममुळे ही बाईक खूप आकर्षक दिसते. बाईकची सीट उंची ८८० मिमी असून एकूण वजन १८३ किलो आहे, जे प्रोफेशनल रॅली बाईकचा अनुभव देते.