शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

KTM च्या चाहत्यांसाठी खुशखबर; लवकरच लॉन्च होणार नवीन Duke बाईक, किंमत अन् फिचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 12:31 IST

1 / 6
KTM 160 Duke : भारतात एकेकाळी KTM कंपनीच्या बाईक्सची प्रचंड क्रेझ होती. खासकरुन तरुणांमध्ये या बाईक्स खूप लोकप्रिय होत्या. मात्र, काही काळापासून KTM बाईक्सची विक्री कमी झाली आहे. अशातच आता KTM नवीन बाईकसह भारतात दमदार पुनरागमन करण्यास सज्ज झाली आहे.
2 / 6
कंपनी लवकरच आपली नवीन KTM 160 Duke ही बाईक लॉन्च करणार आहे. बाईकचा पहिला टीझर नुकताच समोर आला आहे. कंपनी एंट्री-लेव्हल सेगमेंटमध्ये शक्तिशाली मॉडेल आणण्याची तयारी करत आहे. असे मानले जाते की, ही बाईक 125Duke ची जागा घेईल.
3 / 6
टीझरमध्ये बाईकची संपूर्ण माहिती देण्यात आलेली नाही, परंतु ऑटो तज्ञांच्या मते, ही नवीन बाईक KTM 200 Duke च्या प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे. म्हणजेच, या बाईकला सेकंड जनरेशन डिझाइनसारखेच उत्तम डिझाइन मिळेल. या नवीन बाईकमध्ये ट्रेलिस फ्रेम, 43 मिमी यूएसडी फ्रंट फोर्क्स आणि मागील मोनोशॉक सस्पेंशन देखील पाहता येईल.
4 / 6
याशिवाय, ड्युअल-चॅनेल एबीएस आणि एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सारखे आधुनिक फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. ही सर्व फीचर्स दिली गेली तर ही बाईक केवळ दिसायलाच स्टायलिश नसेल तर ती चालवण्यास खूप सुरक्षित आणि आरामदायी असेल.
5 / 6
नवीन केटीएम 160 ड्यूकमध्ये पूर्णपणे नवीन 160 सीसी इंजिन दिले जाईल, जे सध्याच्या 200 ड्यूकच्या इंजिनपासून प्रेरित असेल. हे इंजिन सुमारे 19-20 बीएचपी पॉवर जनरेट करेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे ही बाईक एंट्री-लेव्हल परफॉर्मन्स सेगमेंटमध्ये एक मजबूत पर्याय बनेल. हे शक्तिशाली इंजिन दररोजच्या रायडिंगसाठी, तसेच हायवे क्रूझिंगसाठी उत्तम असेल. KTM ने या बाईकमध्ये त्यांचे सिग्नेचर थ्रोटी एक्झॉस्ट नोट कायम ठेवले, तर ही बाईक तरुण रायडर्सना आवडू शकते.
6 / 6
बऱ्याच अहवालांनुसार, केटीएम ही नवीन बाईक याच ऑगस्ट महिन्यात लॉन्च होण्याची शक्यता आहे. दिवाळीपूर्वी बाईकची चांगली विक्री व्हावी, म्हणून ही वेळ निवडण्यात आली आहे. लॉन्च झाल्यानंतर ही बाईक कंपनीची सर्वात परवडणारी परफॉर्मन्स मोटरसायकल असेल. दरम्यान, कंपनीने अद्याप या बाईकच्या किमतीबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.
टॅग्स :bikeबाईकAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग