शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

Maithili Thakur : "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 12:35 IST

Bihar Election 2025 Result And Maithili Thakur : मैथिलीने तिच्या निवडणूक प्रचारादरम्यान खूप मेहनत घेतली. आता, तिच्या प्रयत्नांना यश येत असल्याचं आता दिसत आहे.

सध्या बिहार निवडणुकीच्या निकालांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावेळी बिहारमध्ये कोणाचं सरकार स्थापन होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वांनाच उत्सुकता आहे. भोजपुरी स्टार्सही निवडणूक रिंगणात उतरले आहेत. खेसारी लाल यादव, रितेश पांडे, मैथिली ठाकूर आणि पवन सिंह यांची पत्नी ज्योती सिंह यांसारखे सेलिब्रिटी यावेळी वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर तिच्या लोकगीतांसाठी ओळखली जाते आणि बिहारमध्ये ती खूप प्रसिद्ध आहे. म्हणूनच जेव्हा मैथिलीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा ती सर्वसामान्य लोकांसाठी काय, काय करेल हे पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. भाजपाने मैथिली ठाकूरला दरभंगा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या अलीनगर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दिली. 

मैथिलीने तिच्या निवडणूक प्रचारादरम्यान खूप मेहनत घेतली. आता, तिच्या प्रयत्नांना यश येत असल्याचं आता दिसत आहे. आजच्या बिहार निवडणूक निकालांमधील सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, मैथिली तिच्या अलीनगर मतदारसंघात आघाडीवर आहे. यावेळी, तिने आज तकशीही संवाद साधला आणि तिचा आनंद व्यक्त केला आहे.

पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या मैथिलीने निकाल पाहिल्यानंतर म्हटलं की, "मला माझं यश दिसत आहे. मी तुमच्या बातम्यांमधून ते पाहत आहे आणि काही काउंटींग एजंट मला सांगत आहेत की, मी अलीनगर मतदारसंघात आघाडीवर आहे. मी आता टीव्हीसमोर बसली आहे आणि मी गेल्या निवडणुकांमध्ये निकालांमध्ये चढ-उतार पाहिले आहेत. म्हणूनच जोपर्यंत मला विजयाचं सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत मी पूर्णपणे समाधानी होणार नाही."

मैथिली ठाकूरच्या उमेदवारीवरून पक्षातूनच नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मैथिली ठाकूर हिच्या उमेदवारीला विरोधही करण्यात आला होता. मात्र असं असलं तरी मैथिली ठाकूरची उमेदवारी नंतर कायम ठेवण्यात आली. सुरुवातीला जे कल हाती आले, त्यानुसार अलीनगर मतदारसंघातून मैथिली ठाकूर आघाडीवर आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Maithili Thakur leads in Bihar election; expresses cautious optimism.

Web Summary : Popular singer Maithili Thakur contested Bihar elections on a BJP ticket. Initial trends show her leading in Alinagar. Despite the lead, she awaits official confirmation, recalling past election result volatility and internal party opposition to her candidacy.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५BJPभाजपाPoliticsराजकारणNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल