शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 15:53 IST

Bihar Election result: बिहार निवडणुकीचे प्रभारी धर्मेंद्र प्रधान आणि सह-प्रभारी विनोद तावडे हे गेल्या काही महिन्यांपासून बिहारमध्ये तळ ठोकून होते.

बिहार विधानसभा निवडणुकीत NDA च्या दणदणीत यशानंतर महाराष्ट्राचे नेते विनोद तावडे यांचे नाव चर्चेत आले आहे. ओबीसी समीकरण साधण्यासोबतच उमेदवार निवडण्यात विनोद तावडेंचा मोठा हात आहे. यामुळे भाजपात त्यांना महासचिव पदापेक्षाही मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

बिहार निवडणुकीचे प्रभारी धर्मेंद्र प्रधान आणि सह-प्रभारी विनोद तावडे हे गेल्या काही महिन्यांपासून बिहारमध्ये तळ ठोकून होते. या दोघांनी आखलेल्या आक्रमक आणि अचूक रणनीतीमुळेच भाजपने राज्यात सर्वाधिक जागा जिंकून आपले स्थान प्रबळ केले आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी बिहारमध्ये पडद्यामागून महत्त्वाची भूमिका बजावली. प्रत्येक मतदारसंघातील उमेदवारांची निवड अत्यंत विचारपूर्वक केली. प्रख्यात गायिका मैथिली ठाकूर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय तावडे यांच्या रणनीतीचा भाग होता. तावडे यांच्या संघटनात्मक कौशल्याचा निवडणुकीत चांगलाच फायदा झाल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत. 

राजकीय तज्ञांच्या मते, भाजप आपल्या या नव्या 'रणनीतीकाराला' मोठे बक्षीस देणार आहे. यामध्ये पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरील एखादे मोठे 'पद' किंवा केंद्रातील मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

बिहारचा मुख्यमंत्री कोण? NDA च्या प्रचंड विजयानंतर मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेल्या चर्चांवर भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तावडे म्हणाले, "आम्ही बिहारची निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढलो, हे सत्य आहे. परंतु, मुख्यमंत्री कोण असेल, याचा निर्णय केवळ दोन पक्ष नव्हे, तर NDA मधील पाचही पक्ष एकत्र बसून घेतील."

English
हिंदी सारांश
Web Title : Vinod Tawde's Role Behind Bihar Victory; BJP Likely to Reward Him

Web Summary : Vinod Tawde played a key role in NDA's Bihar victory, strategizing candidate selection and OBC outreach. His efforts may earn him a significant national position or central responsibility within the BJP.
टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेBihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५BJPभाजपा