Mahindra Bolero चे नवे Neo मॉडेल ‘या’ दिवशी होणार लॉंच; किंमत किती असेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 07:11 PM2021-07-08T19:11:35+5:302021-07-08T19:15:41+5:30

नवीन Mahindra Bolero Neo लवकरच होणार लॉंच होणार आहे. पाहा, डिटेल्स...

देशातील आघाडीच्या कार निर्माता कंपनीपैकी एक म्हणजे महिंद्रा अँड महिंद्रा. अनेक लोकप्रिय कार महिंद्राने आतापर्यंत सादर केल्या आहेत.

महिंद्राच्या कार या दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखल्या जातात. महिंद्राच्या लोकप्रिय कारपैकी आघाडीवर असलेली कार म्हणजे महिंद्रा बोलेरो.

याच महिंद्रा बोलेरो लवकरच एका नवीन अपडेटेड व्हर्जनमध्ये येणार आहे. नवीन बोलेरो कंपनीच्या TUV300 वर आधारित असेल, असे सांगितले जात आहे.

१५ जुलै २०२१ रोजी Mahindra Bolero Neo लॉंच होणार असल्याचे सांगितले जात आहे. या नवीन व्हर्जनमध्ये अनेक बदल केले आहेत. डिझाइन आणि लूकच्या बाबतीत Bolero Neo चं फ्रंट लूक TUV300 प्रमाणेच असेल.

Mahindra Bolero Neo मध्ये नवीन डिझाइनमधील हेडलाइट, नवीन फ्रंट बंपर आणि LED डे टाइम रनिंग लाइट्स मिळतील. या नवीन मॉडेलचा एक टीझरही कंपनीकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे.

नवीन बोलेरो नियोच्या डिझाइनमध्ये क्लसिक मॉडेलची झलक दिसू शकेल. तसेच साइड आणि रिअर लूकमध्येही जास्त बदल नसल्याचे सांगितले जात आहे. पण नवीन बोलेरोचा फ्रंट लूक बदलण्यात आल्याचे दिसून येत आहे.

Bolero Neo मध्ये कंपनी १.५ लिटर क्षमतेचे डिझेल इंजिन देण्यात येऊ शकते. यासोबत ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स असतील.

नवीन बोलेरोमध्ये टीयूवी-300 प्रमाणे फ्युअल सेविंग इंजिन स्टार्ट/स्टॉप टेक्नोलॉजीचा सपोर्टही देऊ शकते. नवीन बोलेरो नियोची किंमत ९ ते १२ लाख रुपयांमध्ये असू शकते, असे सांगितले जात आहे.

दरम्यान, महिंद्रा कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, सन २०२६ पर्यंत महिंद्रा ९ नवीन कार्स किंवा कार्सचे नवीन व्हर्जन बाजारात सादर करणार आहे. यामध्ये महिंद्रा थार या कारच्या ५ डोअर व्हर्जनचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

महिंद्रा कंपनीकडून या माहितीला दुजोरा देण्यात आला आहे. Mahindra Thar खरेदीचे अधिकाधिक ग्राहकांचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी या कारचे नवीन बेस व्हेरिएंट आणणार आहे.