भारतात यंदाच्या वर्षात लाँन्च होताहेत दोन 'मेड इन इंडिया' प्रीमियम SUV कार; जाणून घ्या खास स्पेसिफिकेशन्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 03:20 PM2022-02-27T15:20:41+5:302022-02-27T15:28:41+5:30

ऑटोमेकर Jeep कंपनी भारतात लवकरच दोन जबरदस्त प्रीमियम SUV कार लॉन्च करणार आहे. जाणून घ्या काय असतील स्पेसिफिकेशन्स...

भारतात तयार करण्यात आलेल्या एसयूव्ही ग्रँड चेरोकी (Grand Cherokee) आणि मेरिडियन (Jeep Meridian) दोन जबरदस्त SUV कार अमेरिकन वाहन निर्माती Jeep कंपनी लवकरच लाँच करणार आहे. नव्या कारची निर्मिती रांजणगाव जॉइंट व्हेंचर मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीमध्ये केली जात आहे.

२०२२ च्या अखेरीस कंपनी चार प्लेट्सचा एक पोर्टफोलिओ सादर करणार आहे. सर्व कार स्थानिक पातळीवर उत्पादित केल्या जाणार आहेत. २०२१ च्या सुरुवातीला फिएट क्रिसलर आणि Peugeot च्या विलीनीकरणाद्वारे स्टेलेंटिसची स्थापना झाली. जीप मेरिडियन ही भारतातील पहिली मध्यम आकाराची 3-रो एसयूव्ही आहे.

जीप मेरिडियन फक्त तीन पॉवरट्रेनमध्ये आणि डिझेल दोन ट्रिममध्ये उपलब्ध करुन दिली जाणार आहे. जीप मेरिडियन ही आगामी ७-सीटर SUV, मे 2022 मध्ये शोरूममध्ये दाखल होईल. ही एसयूव्ही कार पूर्णपणे 'मेड-इन-इंडिया' मॉडेल असल्याचा दावा केला जात आहे. टोयोटा फॉर्च्युनर, फोर्ड एंडेव्हर आणि एमजी ग्लोस्टरशी स्पर्धा करण्यासाठी मेरिडयन सज्ज होणार आहे. मेरिडियन कंपासची 7-सीटर आवृत्ती आहे जी जीप कमांडर म्हणून निवडक जागतिक बाजारपेठांमध्ये आधीच विक्री केली जात आहे.

जीप मेरिडियन कार कंपासमध्ये वापरण्यात आलेल्या 2.0L मल्टीजेट II डिझेल इंजिनसह उपलब्ध करुन दिली जाणार आहे. हे इंजिन ऑइल बर्नर 173bhp पॉवर आउटपुट आणि 350Nm टॉर्क जनरेट करते. यात एकतर 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स किंवा 9-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असू शकते.

मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये 4X2 ड्राइव्हट्रेन प्रणाली मिळेल, तर ऑटोमॅटिक मॉडेल 4X2 आणि 4X4 सेटअपसह उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच भारतीय बाजारपेठेसाठी, जीप ग्रँड चेरोकी 2.0-लिटर टर्बो-पेट्रोल पॉवरट्रेनसह सुसज्ज असणार आहे.

जीप ग्रँड चेरोकी ८ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध करुन दिली जाणार आहे. याच ऑटो, स्पोर्ट्स, मड/सँड आणि स्नो असे चार मोड उपलब्ध असणार आहेत. एसयूव्हीच्या स्पेसिफिकेशन्समध्ये को-पॅसेंजरला इंटरॅक्टीव्ह स्क्रीन, हेड अप डिस्प्ले, पावर लिफ्टगेट, व्हेंटिलेटेड सीट्स आणि एक पॅनोरॅमिक सनरूफ देखील असणार आहे.

Jeep च्या या नव्या दोन एसयूव्ही कारचं ८० टक्के उत्पादन पूर्णपणे भारतात होणार आहे. मे महिन्यात या कारचं उत्पादनाला सुरुवात होईल. अमेरिकेच्या बाहेर भारत हे जगातील एकमेव बाजारपेठ आहे जिथं ग्रँड चेरोकी कारचं स्थानिक पातळीवर निर्मिती केली जाणार आहे. २०२२ जीप कंपास ट्रेलहॉक मार्चच्या पहिल्या आठवड्यात डिलरशीपकडे उपलब्ध होईल.