GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 17:52 IST2025-08-20T17:47:18+5:302025-08-20T17:52:02+5:30
यंदाच्या दिवाळीत मोदी सरकार लहान कारवरील GST 28% वरुन कमी करुन 18% करण्याच्या तयारीत आहे.

यंदाच्या दिवाळीत मोदी सरकार छोट्या गाड्यांसह अनेक वस्तूंवरील GST कमी करण्याचा निर्णय घेणार आहे. सध्या गाड्यांवर २८% जीएसटी आणि १% सेस, म्हणजेच एकूण २९% कर आकारला जातो. पण जर हा १८% पर्यंत कमी केला, तर ग्राहकांना १०% चा थेट फायदा होईल. उदाहरणार्थ, जर कारची एक्स-शोरुम किंमत ५ लाख रुपये असेल, तर २९% कर जोडल्यानंतर ती ६.४५ लाख रुपये होते. पण, जीएसटी १८% पर्यंत कमी केला, तर त्याची किंमत फक्त ५.९० लाख रुपये होईल.
Maruti Suzuki Alto - अल्टो K10 ची एक्स-शोरूम किंमत ४.२३ लाख रुपये आहे. त्यात २९% कर, म्हणजेच १.२२ लाख रुपये जोडले जातात. जर जीएसटी १८% पर्यंत कमी केला तर कर फक्त ८०,००० रुपये होईल. याचा अर्थ ग्राहकांना अल्टोवर सुमारे ४२,००० रुपयांची बचत होईल.
Maruti Suzuki WagonR - वॅगनआरची सध्याची किंमत ५.७८ लाख रुपये आहे. त्यावर सुमारे १.६७ लाख रुपये कर आकारला जातो. जीएसटी कमी केल्यानंतर, कर १.०९ लाख रुपये होईल. याचा अर्थ वॅगनआर खरेदीवर सुमारे ५८,००० रुपयांची बचत होईल.
Maruti Suzuki Swift - स्विफ्टची सुरुवातीची किंमत ६.४९ लाख रुपये आहे, ज्यामध्ये सुमारे १.८८ लाख रुपये कर समाविष्ट आहे. जीएसटी कमी केल्यानंतर, कर फक्त १.२३ लाख रुपये होईल. याचा अर्थ स्विफ्टवर सुमारे ६५,००० रुपयांची बचत होईल.
Dzire - झायरची सध्याची किंमत ६.८३ लाख रुपये आहे. त्यावर सुमारे १.९८ लाख रुपये कर आकारला जातो. जीएसटी कमी झाल्यानंतर हा कर १.२९ लाख रुपयांपर्यंत कमी होऊ शकतो. म्हणजेच ग्राहकांना डिझायर सुमारे ६८,००० रुपयांनी स्वस्त मिळेल.
Maruti Brezza - ब्रेझाची सुरुवातीची किंमत ८.६९ लाख रुपये आहे. सध्या त्यावर २.५२ लाख रुपये कर आकारला जातो. जीएसटी १८% झाल्यानंतर कर फक्त १.६५ लाख रुपये होईल. म्हणजेच ग्राहकांना ब्रेझावर सुमारे ८७,००० रुपयांचा फायदा होईल.
Ertiga - एर्टिगाची सुरुवातीची किंमत ९.११ लाख रुपये आहे. सध्या त्यावर २.६४ लाख रुपये कर आकारला जातो. परंतु नवीन कर दरानंतर तो १.७३ लाख रुपये होईल. म्हणजेच एर्टिगावर सुमारे ९१,००० रुपयांची बचत होईल.
सरकारने जीएसटीमध्ये ही मोठी कपात केली तर मध्यमवर्गीय कुटुंबांना कार खरेदी करणे सोपे होईल. विशेषतः पहिल्यांदाच कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अल्टो, वॅगनआर, स्विफ्ट आणि डिझायर सारख्या वाहनांवर चांगली बचत होईल.