वजनदार सेलिब्रिटींच्या 'महागड्या बाईक्स'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 09:36 PM2018-09-17T21:36:56+5:302018-09-17T21:45:42+5:30

तुमच्या लाडक्या जॉन अब्राहमकडे आहे यमाहा कंपनीची शानदार बाईक, 1985 मध्ये लाँच झालेल्या या बाईकची किंमत आहे 30 लाख रुपये.

प्रियंका चोप्रा वापरते हार्डले डेव्हीडसन कंपनीची सुपरडुपर हीट बाईक. गुलाबी कलरची ही बाईक प्रियंकाची सर्वात पंसतीची दुचाकी असून तिच्या पर्सनॅलिटीलाही ती शोभते.

दबंग अभिनेता सलमान खान सुझूकी कंपनीची बाईक वापरतो. सुजुकी इंट्रूडर एम 1800 असे या दुचाकीचे नाव असून हिची किंमत 16 लाख रुपये आहे.

बॉलिवूडचा मुन्नाभाईही दुचाकीचा हौशी अभिनेता आहे. मुन्नाभाई म्हणजे संजुबाबाही हार्डले डेव्हीडसन कंपनीची बाईक वापरत असून त्याची किंमत 15 लाख एवढी आहे.

विवेक ओबेरायही दुचाकीचा चाहता आहे, विवेक डुकाटी कंपनीची स्पोर्ट्स बाइक वापरत असून ही बाईक 2007 साली मार्केटमध्ये आली आहे. या बाईकची किंमत 45 लाख रुपये आहे.