दिवाळीला घरी घेऊन या सर्वात सुरक्षित कार; 5-Star Rating सह Global NCAP चा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 09:41 PM2023-11-03T21:41:23+5:302023-11-05T13:20:32+5:30

Global NCAP 5-Star Rating Cars: नवीन कार खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर या गाड्यांवर एकदा नजर टाका.

Global NCAP 5-Star Rating Cars: वर्षातील सर्वात मोठा सण, म्हणजेच दिवळी जवळ आला आहे. या दिवाळीत तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला काही गाड्यांची माहिती देणार आहोत, ज्यांना NCAP कडून 5 स्टार रेटिंग मिळाले आहे. 5 स्टार रेटिंग म्हणजे, या गाड्या सर्वाधिक सुरक्षित गाड्या आहेत.

Tata Harrier/Safari Facelift 2023- टाटा मोटर्सने अलीकडेच टाटा हॅरियर आणि सफारीचे फेसलिफ्ट व्हर्जन्स लॉच केले. कंपनीने लॉन्चदरम्यान माहिती दिली होती की, या दोन्ही गाड्यांना ग्लोबल NCAP कडून 5 स्टार रेटिंग मिळाले आहे. या दोन्ही कार अतिशय सुरक्षित असून या दोन्ही कार भारत एनसीएपीमध्ये चाचणीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

Volkswagen Virtus- या कारची सुरुवातीची एक्स-शोरुम किंमत 11.48 लाख तर, टॉप व्हेरिएंटची किंमत 19.29 लाख रुपये आहे. या कारला ग्लोबल NCAP कडून 5 स्टार रेटिंग मिळाले आहे. या कारमध्ये 1 आणि 1.5 लीटर इंजिनचे पर्याय उपलब्ध आहेत. सुरक्षेच्या दृष्टीनेही ही कार खूप चांगली आहे. Skoda Slavia- या कारची एक्स-शोरूम किंमत 10.89 लाख रुपये आहे आणि टॉप व्हेरिएंटची किंमत 19.12 लाख रुपये आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीनेही ही कार 5 स्टार रेटिंगसह येते.

Skoda Slavia- या कारची एक्स-शोरूम किंमत 10.89 लाख रुपये आहे आणि टॉप व्हेरिएंटची किंमत 19.12 लाख रुपये आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीनेही ही कार 5 स्टार रेटिंगसह येते.

Skoda Kushaq- या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 11.62 लाख रुपयांपर्यंत आणि टॉप व्हेरिएंटची किंमत 19.76 लाख रुपयांपर्यंत जाते. ही कार 5 स्टार रेटिंगसह येते.

Volkswagen Taigun- Volkswagen Taigun ची सुरुवातीचीएक्स-शोरूम किंमत 10.89 लाख आणि टॉप व्हेरिएंटची किंमत 20.01 लाख रुपये आहे. या कारला 5 स्टार रेटिंग मिळाले आहे.

Hyundai Verna- Hyundai ची पहिली कार आहे, ज्यात ग्लोबल NCAP मध्ये 5 स्टार रेटिंग मिळते. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 10.90 लाख रुपये आहे आणि टॉप व्हेरिएंटची किंमत 17.38 लाख रुपये आहे.

Mahindra Scorpio N- महिंद्राच्या नवीन स्कॉर्पिओला ग्लोबल NCAP कडून 5 स्टार रेटिंग मिळाले आहे. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 13.26 लाख रुपये आणि टॉप व्हेरिएंटची किंमत 24.54 लाख रुपये आहे.