शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Electric Car Range Tips: इलेक्ट्रीक कार, स्कूटरची रेंज वाढविणे सोपे; या ट्रीक्स वापरा, बिनधास्त चालवा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 12:18 PM

1 / 7
देशात सध्या इलेक्ट्रीक वाहनांचे वारे सुरु आहे. रेंजच्या धास्तीमुळे अद्याप या वाऱ्यांचे वादळात रुपांतर झालेले नाही. असे असले तरी यंदाच्या वर्षात अनेक कंपन्या इलेक्ट्रीक कार लाँच करण्यामागे लागल्या आहेत.
2 / 7
लाँचवेळी कंपन्या दावा करत असलेली रेंज सोडा त्याहून खूप कमी रेंज प्रत्यक्षात ग्राहकांना मिळत आहे. यामुळे नकारात्मक रिव्ह्यू लोकांपर्यंत जात असल्याने घेण्याची इच्छा असलेले लोकही नको म्हणत मागे फिरत आहेत.
3 / 7
अशावेळी तुम्ही काही टिप्स आणि ट्रिक्स वापरून कारची रेंज वाढवू शकता. सर्वात पहिली बाब म्हणजे वेगाने वाहन चालवणे टाळा. चांगली रेंज हवी असल्यास तुम्ही वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. गरज असेल तेव्हाच वेगाने कार चालवा. स्कूटरच्या बाबतीतही तेच आहे. जास्त वेगाने गाडी चालविली तर बॅटरी जास्त खपते. अशावेळी जेवढी रेंज दाखविलेली असते त्यापेक्षा निम्मी रेंज मिळते.
4 / 7
बॅटरी जास्त वेगाने संपण्याचे कारण म्हणजे उष्णता. यामुळे गाडी उन्हात जास्त वेळ उभी करू नये. उन्हाळ्यात तुम्हाला विशेष काळजी घेण्याची गरज आहे. जसा मोबाईल गरम झाला की बॅटरी झपाझप उतरते तसाच प्रकार गाड्यांमध्ये देखील आहे. इंजिन तापले की जास्त वीज लागेल, तसेच गाडी आतून गरज झाली तर ती थंड करण्यासाठी एसीदेखील जास्त वीजेची वापर करेल.
5 / 7
ओव्हरलोडिंगमुळे, कारच्या मोटरवर अधिक दाब पडतो. अशा परिस्थितीत बॅटरीचा वापर वाढतो. तुम्ही तुमची इलेक्ट्रिक कार ओव्हरलोड करणे टाळावे. गरज नसेल तर उगाचच छोट्या छोट्या वस्तू गाडीत ठेवू नयेत. यामुळे वजन वाढते जे आपल्या लक्षात येत नाही. तसेच प्रवासावेळी जास्त सामानदेखील नेऊ नये. आवश्यक असलेलेच साहित्य घ्यावे.
6 / 7
जर तुम्हाला चांगली रेंज हवी असेल तर टायरमधील हवेचा दाबदेखील योग्य ठेवायला हवा. हवा कमी झाली तर जमिनीशी घर्षण वाढते, यामुळे पुढे जाण्यासाठी इंजिनाला जास्त ताकद द्यावी लागते. यामुळे हवा योग्य वेळी तपासावी.
7 / 7
खरेतर या गोष्टी पेट्रोल, डिझेलच्या गाड्यांनाही लागू पडतात. परंतू, या गाड्यांच्या मायलेजमध्ये फारसा फरक पडत नसल्याने कोणी या गोष्टी गंभीरतेने घेत नाही.
टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरElectric Carइलेक्ट्रिक कार