अवघ्या २ हजारात बुक करा देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार; जुलैमध्ये लॉन्च होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 04:39 PM2022-06-14T16:39:32+5:302022-06-14T16:42:51+5:30

इलेक्ट्रीक कारची क्रेझ ग्राहकांमध्ये वाढत चालली आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे ग्राहकांचा कल इलेक्ट्रीक वाहनांकडे वाढत चालला आहे. इलेक्ट्रीक वाहनांची किंमत महाग असते त्यासाठी अनेकांना इच्छा असूनही ती खरेदी करता येत नाही.

परंतु चिंता सोडा, तुमचं बजेट कमी असले तरी तुम्हाला इलेक्ट्रीक कार खरेदी करता येऊ शकते. इलेक्ट्रीक कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे.

रिपोर्टनुसार, भारतीय ईवी स्टार्टअप पीएमवी इलेक्ट्रीक(PMV Electric) देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार बाजारात आणत आहे. येत्या जुलै महिन्यात ही कार लॉन्च होऊ शकते. या कारला ४ दरवाजे आणि २ सीट आहेत.

ग्राहकांना कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन बुकींग करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. पीएमवी इलेक्ट्रीकनं ईएएस ई इलेक्ट्रीक कारला न्यू जेनरेशन ग्लोबल माइक्रो इलेक्ट्रीक व्हिकल सिट्रॉन एएमआय आणि एमजी ई २०० सारखे डिझाईन केले आहे.

या कारमध्ये ग्राहकांना १० KWH ची लिथियम आयरन फोस्फेट बॅटरी मिळेल. ज्याला ३ Kw एसी चार्जरनं चार्ज करता येईल. सिंगल चार्जमध्ये १६० किमी धावणार, कंपनीचा दावा आहे की, EaS-E ही इलेक्ट्रीक कार सिंगल चार्ज केल्यावर १६० किमी अंतर गाठू शकते.

अवघ्या ४ तासांत या कारची बॅटरी फूल चार्ज करता येऊ शकते. तसेच ५ ते ८ वर्ष बॅटरी सेल आरामात चालतील. परंतु तुम्ही कारचा वापर किती करता यावर ते निर्भर असेल. देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कारमध्ये ग्राहकांना कमालीचे फिचर्स मिळणार आहेत.

किंमत आणि बुकींग - ईएएम ई इलेक्ट्रीक कार ११ विविध व्हेरिएंटमध्ये ग्राहकांना उपलब्ध होईल. कंपनीच्या वेबसाईटनुसार, या कारची किंमत ४-५ लाख रुपये एक्स शोरुम प्राइस असेल. ग्राहक कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन २ हजार रुपये रिफंडेबल अमाऊंटसह इलेक्ट्रीक कारचं बुकींग करू शकतात.

सध्या टाटा टिगोर ईवी कार १२ लाख ४९ हजारापर्यंत शोरुममध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे ही इलेक्ट्रीकमधील आतापर्यंत सर्वात स्वस्त कार आहे. ईएएसई ही इलेक्ट्रीक कार लॉन्च झाल्यानंतर ती देशातील सर्वात स्वस्त ई कार असेल.

EaS-E चे फिचर्स फिचर्सबाब बोलायचं झालं तर कारमध्ये EaS-E मोड, क्रूज कंट्रोल, रिमोट पार्किंग असिस्ट, रिमोट कनेक्टिव्हिटी आणि डायग्लॉस्टिक, स्टिअरिंग माऊंडेट कंट्रोल, सेफ्टी बेल्ट, LCD डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर असेल. त्याचसोबत रिमोट कीलेस एन्ट्री, पावर विंडो, इलेक्ट्रॉनिकली कंट्रोल मिरर्स, रिव्हर्स व्ह्यू कॅमेरा, एसी, LED हेडलॅप्स देण्यात आले आहेत.

कारचं आकर्षक डिझाइन हे वैशिट्य आहे. ही कार 2915 mm लांब, 1157mm रुंद आणि उंची 1600mm असणार आहे. कारचा ग्राऊंड क्लिअरन्स 170mm आहे. तर वजन 575 किलो इतकं आहे. फ्रंट डिस्क ब्रेक आणि रिअरमध्ये ड्रम ब्रेक देण्यात आला आहे