जबरदस्त फीचर्स अन् किंमतही कमी; 'ही' आहे Maruti Ertiga पेक्षा स्वस्त 7-सीटर कार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 17:29 IST2023-06-22T17:24:36+5:302023-06-22T17:29:47+5:30

Most Affordable 7-Seater Car: भारतात 7-सीटर गाड्यांची मागणी झपाट्याने वाढत आहे. या सेगमेंटमध्ये अनेक स्वस्त गाड्याही उपलब्ध आहेत.

Renault Triber: भारतात सर्वात स्वस्त 7-सीटर एमपीव्हीबद्दल विचारल्यावर बहुतांश लोक मारुती सुझुकी अर्टिगा(Marutu Ertiga) चे नाव घेतात. पण, सध्या अर्टिगापेक्षाही स्वस्त एमपीव्ही भारतीय बाजारात उपलब्ध आहे.

ही गाडी जास्त लोकप्रिय नसल्यामुळे अनेक ग्राहक या गाडीच्या खरेदीला प्राधान्य देत नाहीत. पण, ज्यांना कमी पैशात 7 सीटर हवी असेल, त्या लोकांसाठी ही अतिशय योग्य गाडी आहे. या गाडीचे नाव रेनो ट्रायबर आहे.

रेनो ट्रायबरची किंमत 6.33 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 8.97 लाख रुपये (एक्स-शोरुम) पर्यंत जाते. तर, मारुती अर्टिगाची किंमत 8.64 लाख रुपयांपासून सुरू होते.

म्हणजेच, अर्टिगाच्या बेस व्हेरिएंटच्या किमतीत ट्रायबरचे टॉप व्हेरिएंट तुम्हाला मिळू शकते. ट्रायबर चार व्हेरिएंट- आरएक्सई, आरएक्सएल, आरएक्सटी आणि आरएक्सजेडमध्ये उपलब्ध आहे.

ट्रायबरमध्ये 84 लिटरचा बूट स्पेस मिळतो, जो थर्ड रो वरील सीट्स फोल्ड केल्यानंतर 625 लिटरचा होतो. यात मोनोटोन आणि पाच ड्यूल टोन कलर शेड मिळतात.

कंपनीने या गाडीत 8-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम, अँड्रॉयड ऑटो, अॅपल कारप्ले, 6-वे अॅडजस्टेबल ड्रायवर सीट (हाइट अॅडजस्टमेंटसोबत), प्रोजेक्टर हेडलँप्स आणि एलईडी टर्न इंडिकेटर्स मिळतात.

गाडीत स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स (म्यूजिक आणि फोन), सेकंड आणि थर्ड रोसाठी एसी व्हेंट्स, पुश बटन स्टार्ट-स्टॉप, सेंटर कंसोलमध्ये कूल्ड स्टोरेज आणि डिझिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, 4 एअरबॅग (फ्रंट आणि साइड), ईबीडीसोबत एबीएस, रिअर पार्किंग सेंसर आणि रिअर व्ह्यू कॅमेरासारखे फीचरदेखील मिळतात.

ट्रायबरमध्ये 1.0 लिटर 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळते, जे 72 पीएस आणि 96 एनएम आउटपुट देण्यास सक्षम आहे. तसेच, यात 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि एएमटी गिअरबॉक्सचा पर्यायदेखील आहे. विशेष म्हणजे, ही गाडी 20 किलोमीटरपर्यंतचे मायलेज देते.