२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 18:18 IST2025-07-16T18:01:26+5:302025-07-16T18:18:05+5:30
तुम्ही लॉन्ग ड्राईव्हसाठी दमदार EV बाईकच्या शोधात असाल, तर ही बाईक तुमच्यासाठी उपयुक्त आहे.

इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी Komaki इलेक्ट्रिकने भारतात एक नवीन क्रूझर इलेक्ट्रिक मोटरसायकल लॉन्च केली आहे. रेंजर प्रो आणि प्रो+, असे या दोन बाईक्सचे नाव आहे. या बाईकची खासियत म्हणजे, क्लासिक स्टाइलिंग आणि अॅडव्हान्स्ड एर्गोनॉमिक्ससह लांब अंतर कापण्यासाठी या बाईकमध्ये अधिक रेंज मिळेल.
बाईकची सर्वात मोठी खासियत म्हणझे, बाईकची किंमत फक्त १.३० लाख रुपयांपासून सुरू होते. तर, प्लस व्हेरिएंटची किंमत १.४० लाख रुपयांपर्यंत आहे. या किंमतीत तुम्हाला बाईकच्या सर्व अॅक्सेसरीजदेखील मिळतील.
आकर्षक लूक आणि दमदार परफॉरमन्स असलेली क्रूझर इलेक्ट्रिक बाईक शोधणाऱ्यांसाठी ही बाईक एक चांगला पर्याय आहे. या बाईकची रनिंग कॉस्ट कोणत्याही पेट्रोल बाईकपेक्षा खूप कमी आहे, ज्यामुळे ही दैनंदिन वापरासाठी एक उत्तम पर्याय बनेल.
रेंज आणि परफॉर्मन्सबद्दल बोलायचे झाले तर, या बाईकमध्ये ४.२ किलोवॅटची Lipo4 बॅटरी वापरली गेली आहे. प्रो व्हर्जनमध्ये सिंगल चार्जवर बाईकची रेंज १६० ते २२० किमी पर्यंत जाते. प्रो प्लस व्हर्जन बाईकची रेंज १८० ते २४० किमी दरम्यान आहे.
दोन्ही व्हर्जनमध्ये ५ किलोवॅट हाय टॉर्क मोटर आहे. ही बाईक फक्त ५ सेकंदात ० पासून टॉप स्पीडपर्यंत पोहोचू शकते. कंपनीचा दावा आहे की, ही बाईक हायवेवर तसेच शहरी रायडिंगसाठी उत्तम आहे.
यात डिजिटल डॅशबोर्ड, क्रूझ कंट्रोल, रिव्हर्स मोड, ब्लूटूथ साउंड सिस्टम आणि मोबाइल चार्जिंग सुविधा आहे. राईड कम्फर्टबद्दल बोलायचे झाले तर, दोन्ही मॉडेल्समध्ये टेलिस्कोपिक सस्पेंशन, ड्युअल डिस्क ब्रेक, बॅकरेस्टसह आरामदायी सीट्स आणि मागील टेल लॅम्प गार्ड यांचा समावेश आहे.
दैनंदिन गरजा लक्षात घेऊन, कंपनीने ५० लिटर स्टोरेज कंपार्टमेंट, पार्क असिस्ट, ऑटो रिपेअर स्विच, टर्बो मोड आणि मागील बाजूस प्रोटेक्शन गार्ड अशी अनेक नवीन वैशिष्ट्ये दिली आहेत.