स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 20:52 IST2025-04-28T20:47:52+5:302025-04-28T20:52:54+5:30

2025 Royal Enfield Hunter 350 Launched: रॉयल एनफील्डने त्यांची हंटर ३५० बाईक स्टायलिश लूकसह बाजारात आणली आहे.

देशातील आघाडीची दुचाकी निर्माता कंपनी रॉयल एनफील्डने त्यांची सर्वात परवडणारी बाईक हंटर ३५० आता नव्या अवतारात लॉन्च केली आहे. कंपनीने या बाईकमध्ये काही बदल केले आहेत, ज्यामुळे ही बाईक आधीच्या तुलनेत आणखी खास ठरली आहे.

दिल्लीत झालेल्या हंटरहूड फेस्टिव्हलमध्ये ही बाईक लॉन्च करण्यात आली. बाईकच्या डिझाइनमध्ये कोणताही बदल झाला नाही. ही बाईक तीन नव्या रंगासह बाजारात दाखल झाली आहे. ज्यामध्ये रिओ व्हाइट, टोकियो ब्लॅक आणि लंडन रेड यांचा समावेश आहे.

नवीन रंग पर्यायाव्यतिरिक्त कंपनीने या बाईकचे एर्गोनॉमिक्स देखील अपडेट केले आहेत. त्यात नवीन एलईडी हेडलाइट्स समाविष्ट करण्यात आल्या आहेत. याशिवाय, बाईकच्या मागील बाजूस पारंपारिक गोल आकाराचे टेल-लाइट्स आणि इंडिकेटर्स देण्यात आले आहेत.

या बाईकच्या सस्पेंशन सेटअपमध्ये आणखी एक मोठा बदल दिसून येत आहे. हंटर ३५० च्या जुन्या मॉडेलमधील सस्पेंशन सेटअपबाबत लोकांच्या तक्रारी होत्या. कंपनीने हे सस्पेंशन सेटअप देखील अपग्रेड केले

या बाईकच्या मूळ किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. या बाईकची सुरुवाती किंमत १.५० लाख रुपये आहे.