शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
5
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
6
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
7
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
8
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
9
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
10
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
11
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
12
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
13
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
14
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
15
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
16
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
17
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
18
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
19
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
20
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
Daily Top 2Weekly Top 5

परभणी मनपाच्या ११ समित्यांच्या निवडी बिनविरोध; स्थायी समितीसह सात समित्यांवर महिलाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 18:47 IST

परभणी मनपा: उद्धव सेनेकडे ६ तर काँग्रेसकडे ४ समित्या; राष्ट्रवादी अजित पवार गटालाही मिळाले एक सभापतीपद.

- राजन मंगरुळकरपरभणी : महापालिकेच्या स्थायी समितीसह सात विषय समित्या आणि तीन प्रभाग समितींच्या सभापती पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने या निवडी बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये उद्धवसेनेला सहा तर काँग्रेसला चार आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला एक समिती मिळाली आहे. या ११ समित्यांपैकी आठ समित्यांचे सभापती म्हणून महिलांची वर्णी लागली तर तर तीन सभापतीपद पुरुषांकडे आले आहेत.

मनपाच्या स्थायी समिती सभापती, सात विषय समित्या आणि तीन प्रभाग समिती यांच्या सभापती पदासाठी बुधवारी नामनिर्देशन दाखल करण्याची प्रक्रिया झाली. प्रभारी नगरसचिव यांच्याकडे बुधवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० या वेळेत हे अर्ज दाखल करण्यात आले. उद्धव सेना, काँग्रेस यांच्याकडून सर्व समित्यांचे सभापतीपदाचे अर्ज दाखल करण्यासाठी महापौर सय्यद इकबाल, उपमहापौर गणेश देशमुख, माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे, सभागृह नेते सय्यद समी, उद्धव सेनेचे गटनेते दिलीप ठाकूर, काँग्रेसचे गटनेते गुलमीर खान, अतुल सरोदे, व्यंकट डहाळे, सुनील देशमुख यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. या सर्व समित्यांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने आता या निवडी बिनविरोध झाल्या आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजता बी.रघूनाथ सभागृहात पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या उपस्थितीत या निवडीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. यामध्ये प्रभाग समिती अ, प्रभाग समिती ब चे सभापती आणि समाज कल्याणचे सभापती म्हणून तीन पुरुष राहणार आहे तर उर्वरित सर्व आठ सभापतींचा मान हा महिलांना मिळाला आहे.

या प्रभागांना मिळाले सभापतीपदप्रभाग क्रमांक दोन, तीन, चार, सहा, ९, ११, १२, १५ या प्रभागातील नगरसेवकांना सभापती म्हणून विराजमान होण्याची संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे, प्रभाग ९ मध्ये दोन सदस्यांना सभापतीपद मिळाले तर प्रभाग ११ मध्ये दोन समित्यांसह प्रभाग समितीचे सभापती असे एकूण तीन सभापतीपद मिळाले आहेत. या सर्व सभापतींच्या निवडी एक वर्षासाठी राहणार आहेत.

असे आहेत सभापतीस्थायी समिती : प्रतिभा सरोदे, उद्धवसेनासमाज कल्याण सभापती : राजेश रणखांबे, उद्धवसेनावैद्यकीय व आरोग्य सहाय्य : अबोली कांबळे, उद्धवसेनाशहर सुधार समिती : शुभांगी पाष्टे, उद्धवसेनास्थापत्य समिती : सायरा बेगम अलिमोद्दीन, उद्धवसेनामाध्यमिक पूर्व माध्यमिक व तांत्रिक समिती : शमशाद बेगम सय्यद इलाही, काँग्रेसविधी समिती : रुकसाना बेगम अब्दुल हमीद जहागीरदार, काँग्रेसमहिला व बालकल्याण सभापती : अश्विनी जाधव, काँग्रेसप्रभाग समिती अ सभापती : रहिस खान सर्फराज खान, उद्धवसेनाप्रभाग समिती ब सभापती : खान मुसद्दीक खान नुरुल्ला खान, काँग्रेसप्रभाग समिती क सभापती : तबसुम वसीम शेख, राष्ट्रवादी अजित पवार

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani Municipal Corporation Committee Elections Unopposed; Women Dominate Seven Committees

Web Summary : Parbhani Municipal Corporation's 11 committee elections were unopposed, with women leading seven, including the Standing Committee. Uddhav Sena secured six committees, Congress four, and NCP (Ajit Pawar) one. Eight committees are now headed by women.
टॅग्स :parabhaniपरभणीMunicipal Corporationनगर पालिका