शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

कोद्री आरोग्य केंद्रातील सुविधांना विटेकरांनी घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:15 IST

कोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याची तक्रात जिल्हा परिषदेचे सदस्य भगवानराव सानप यांनी केली ...

कोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याची तक्रात जिल्हा परिषदेचे सदस्य भगवानराव सानप यांनी केली होती. या आरोग्य केंद्रातील अनियमिततेचा त्यांनी काही दिवसापूर्वी कारभार चव्हाट्यावर आणला होता. या पार्श्वभूमीवर माजी जि.प. अध्यक्ष राजेश विटेकर यांनी मंगळवारी या आरोग्य केंद्रास भेट देऊन येथील आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. यावेळी जि.प. सदस्य भगवान सानप यांनी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ विद्यासागर लटपटे यांच्या कारभाराविषयी विटेकर यांच्याकडे तक्रार केली. तसेच येथील समस्या सोडवून जनतेला चांगली आरोग्य सेवा देण्याची विनंती केली. यावेळी विटेकर यांनी जि.प. सीईओ शिवानंद टाकसाळे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून येथील आरोग्य केंद्राकडे वैयक्तिक लक्ष देऊन येथील समस्या सोडविण्याची विनंती केली. त्यावर टाकसाळे यांनी लवकरच आपण स्वत: कोद्रीला भेट देऊन येथील समस्यांचा आढावा घेऊ. तसेच येथील समस्या मार्गी लागण्याचे आश्वासन दिले. यावेळी जि.प. सदस्य भगवान सानप यांच्या प्रयत्नातून जि.प. स्थानिक निधीमधून रुग्णांच्या नातेवाईकांसाठी उभारण्यात आलेली धर्मशाळा, पीएम रूम, आरोग्य केंद्र परिसरातील सिमेंट रस्त्याच्या कामाचे लोकर्पण व उद्घा‌टन विटेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी विटेकर यांचा कोद्री ग्रा.पं.च्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मोहनराव लटपटे,वैजनाथराव लटपटे, कार्तिक फड, बालाजी लटपटे, वैजनाथ माळकरी, साहेब पहिलवान, कोंडीराम पाटील, ॲड भागवत मुंडे, निळोबा मुंडे, अर्जुन लटपटे, संतोष लटपटे, विनायक सावंत, पप्पू सावंत, कैलास लटपटे, गोपाळ फड, आकाश मुंडे, धीरज मुंडे, महादेव बिडगर, महादेव टिकनर आदींची उपस्थिती होती.