परभणीत कॉंग्रेसच्या माजी मंत्र्यांचे भाऊ विजयराव वरपूडकर भाजपात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2021 03:39 PM2021-10-12T15:39:15+5:302021-10-12T15:40:02+5:30

BJP जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीत गळती 

Vijayrao Varpudkar, brother of former Congress minister in Parbhani, joins BJP | परभणीत कॉंग्रेसच्या माजी मंत्र्यांचे भाऊ विजयराव वरपूडकर भाजपात 

परभणीत कॉंग्रेसच्या माजी मंत्र्यांचे भाऊ विजयराव वरपूडकर भाजपात 

Next
ठळक मुद्देभाजपत इनकमिंग सुरूच आहे

परभणी :  काँग्रेसचे ( Congress ) आमदार आणि माजी मंत्री सुरेश वरपूडकर ( Suresh Varpudkar ) यांचे बंधू विजयराव वरपूडकर ( Vijayrao Varpudkar ) यांनी आज भाजपात प्रवेश केला. भाजप ( BJP ) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांच्या उपस्थितीत त्यांनी परभणी येथे प्रवेश केला. विजय वरपूडकर काही काळ राष्ट्रवादीचे ( NCP ) जिल्हा अध्यक्ष सुद्धा होते. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि आता भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. ( brother of former Congress minister in Parbhani, joins BJP) 

परभणी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्का बसला आहे. माजी मंत्री आणि आमदार सुरेश वरपूडकर यांचे भाऊ विजयराव वरपूडकर यांनी आज दुपारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी परभणीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी ही यावेळी भाजपत प्रवेश केला. विजयराव वरपूडकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणे बदलू शकतात. मागील काही काळापासून ते राजकारणात फारसे सक्रीय नव्हते मात्र, त्यांना जिल्ह्यातील राजकारणाचे बारकावे माहिती असल्याने भाजपला जिल्ह्यात याचा फायदा मिळू शकतो. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विजयराव वरपूडकर यांनी भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थेत आघाडी मिळवून देऊ अशी ग्वाही दिली. 

सर्वांना मानाच्या जागा देऊ  
विजयराव वरपूडकर हे मागील सहा महिन्यांपासून भाजप सोबत होते. त्यांचा प्रवेश आज. याचा विशेष उल्लेख चंद्रकांत पाटील यांनी करत भाजप आलेल्या सर्वांना मानाच्या जागा देऊ असे आश्वासन यावेळी दिले.

Web Title: Vijayrao Varpudkar, brother of former Congress minister in Parbhani, joins BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app