शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
2
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
3
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
4
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
5
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
6
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
7
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
8
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
9
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
10
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
11
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
12
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
13
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
14
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
15
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
16
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
17
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
18
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
19
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
20
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

परभणीच्या महापौरपदी उद्धवसेनेचे सय्यद इकबाल ३९ मते घेत विजयी! भाजपचा पराभव

By राजन मगरुळकर | Updated: February 12, 2026 12:41 IST

महापौर पदासाठी अनेक इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते, मात्र शेवटी भाजपच्या तिरुमला खिल्लारे आणि उद्धवसेनेचे सय्यद इकबाल यांच्यात थेट लढत झाली.

परभणी: परभणी महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज झालेला सत्तेचा संघर्ष अखेर महाविकास आघाडीच्या विजयाने संपला आहे. उद्धवसेनेचे सय्यद इकबाल यांनी भाजपच्या उमेदवाराचा १३ मतांनी पराभव करत महापौरपदाची खुर्ची पटकावली आहे. तर उपमहापौरपदी काँग्रेसचे अनुभवी नगरसेवक गणेश देशमुख यांची निवड निश्चित झाली आहे.

अशी पार पडली मतदान प्रक्रिया, महापौर पदासाठी अनेक इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते, मात्र ऐनवेळी काँग्रेस आणि उद्धवसेनेच्या इतर उमेदवारांनी माघार घेतल्याने लढत थेट भाजपचे तिरुमला खिल्लारे आणि उद्धवसेनेचे सय्यद इकबाल यांच्यात झाली. पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या मतदानात सय्यद इकबाल यांना ३९ मते मिळाली, तर भाजपच्या खिल्लारे यांना २६ मतांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे ( अजित पवार) नगरसेवक अक्षय देशमुख आणि अपक्ष नगरसेवक रजिया बेगम यांनीही उद्धवसेनेच्या बाजूने मतदान केल्याने आघाडीचे पारडे जड झाले.

मध्यरात्री मुंबईहून आले, सकाळी ठरली रणनीती 
या निवडणुकीसाठी मोठी रणनीती आखण्यात आली होती. उद्धवसेनेचे २५ नगरसेवक मुंबईहून मध्यरात्री परभणीत दाखल झाले होते. पाथरी रोडवरील मोरया लॉन्स येथे काँग्रेस आणि उद्धवसेनेच्या ३७ नगरसेवकांची बैठक होऊन सत्तेचा 'फॉर्म्युला' ठरवण्यात आला होता. या बैठकीत ठरल्याप्रमाणे सर्व सदस्यांनी एकजुटीने मतदान केले.

पहिल्यांदा नगरसेवक अन् महापौरपद
सय्यद इकबाल हे पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आले असून, त्यांच्या रूपाने शहराला नवा चेहरा मिळाला आहे. तर तीन वेळा नगरसेवक राहिलेले गणेश देशमुख यांच्या अनुभवाचा फायदा शहराला होणार आहे. या विजयानंतर कार्यकर्त्यांनी महापालिका परिसरात गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष साजरा केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Uddhav Sena's Syed Iqbal Wins Parbhani Mayor Post, Defeating BJP

Web Summary : Syed Iqbal of Uddhav Sena secured victory in Parbhani mayoral election with 39 votes, defeating BJP's candidate. Congress' Ganesh Deshmukh became deputy mayor. Strategy meetings were held before the election to ensure victory.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Parbhani Municipal Corporation Electionपरभणी महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६