शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
2
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
3
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
4
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
5
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
6
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
7
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
8
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
9
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
10
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
11
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
12
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
13
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
14
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
15
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
16
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
17
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
18
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
19
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
20
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

उद्धवसेनेचे नगरसेवक परभणीत मध्यरात्री दाखल; महापौर निवडीपूर्वी काँग्रेससोबत एकत्रित बैठक

By राजन मगरुळकर | Updated: February 12, 2026 11:16 IST

बी रघुनाथ सभागृहाच्या परिसराला पोलिसांच्या कडेकोट सुरक्षेमुळे छावणीचे स्वरूप आले आहे.

परभणी : परभणी शहराच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीला अवघा एक तास शिल्लक आहे. सध्या परभणी महापालिकेतील उद्धवसेना आणि काँग्रेस यांच्या ३७ नगरसेवकांची एकत्रित बैठक पाथरी रोडवरील मोरया लॉन्स येथे सुरू आहे. त्यामुळे अकरा वाजता सुरू होणाऱ्या सभेपूर्वी दोन्ही पक्षाकडून महापौर आणि उपमहापौर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर हे सर्व सदस्य विशेष सभा होणाऱ्या बी रघुनाथ सभागृहात एकत्रित दाखल होणार आहेत. 

उद्धवसेनेचे २५ नगरसेवक मुंबईहून मध्यरात्री परभणी शहरातील एका लॉन्सवर दाखल झाले.  काँग्रेसचे १२ सदस्य देखील या ठिकाणी सकाळी पोहोचले. बुधवारी रात्री खासदार संजय जाधव, आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी सर्व सदस्यांची भेट घेतली. गुरुवारी सकाळपासून सर्व सदस्यांचे एकत्रित चर्चा आणि बैठका सुरू आहेत. महापौर निवडीची आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी अंतिम बैठक या दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांकडून घेतले जात आहे. 

बी.रघुनाथ सभागृहाला छावणीचे स्वरूप 
महापौर आणि उपमहापौर यांच्या पदाची निवड वसमत रोडवरील बी रघुनाथ सभागृह येथे अकरा वाजता पिठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे. या बैठकीसाठी पोलीस प्रशासनाने सकाळी नऊ वाजेपासूनच या ठिकाणी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. सभागृहातील मुख्य प्रवेशद्वारातून महापालिका आणि प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी यांना ओळखपत्र तपासून सोडले जात आहे तर अकरा वाजता सर्व सदस्य दाखल झाल्यानंतर त्यांचेही ओळखपत्र तपासून प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे या निवडीपूर्वीच बी रघुनाथ सभागृहाच्या परिसराला पोलिसांच्या कडेकोट सुरक्षेमुळे छावणीचे स्वरूप आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Uddhav Sena Corporators Arrive in Parbhani; Meeting Before Mayor Election

Web Summary : Uddhav Sena and Congress corporators gathered in Parbhani before the mayoral election. A joint meeting was held to finalize candidates before the special assembly. Security was heightened at the B Raghunath Hall, resembling a cantonment, for the election proceedings.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Parbhani Municipal Corporation Electionपरभणी महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Shiv Senaशिवसेना