शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत दुचाकी, चारचाकी वाहनास प्रतिबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 22:51 IST

कोरोना या विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी अत्यावश्यक कामाशिवाय चारचाकी व दुचाकी वाहनांना रस्त्यावरुन फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे मंगळवारपासून आता रस्त्यांवरील वाहतूकही प्रशासनाने प्रतिबंधित केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कोरोना या विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी अत्यावश्यक कामाशिवाय चारचाकी व दुचाकी वाहनांना रस्त्यावरुन फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे मंगळवारपासून आता रस्त्यांवरील वाहतूकही प्रशासनाने प्रतिबंधित केली आहे.जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना सुरु केल्या असून त्यात चारचाकी व दुचाकी वाहनांनाही अत्यावश्यक कामाशिवाय रस्त्यावर येण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, जिल्ह्यात घर, इमारतीचे बांधकाम अनेक भागात होत असून त्या ठिकाणी गर्दी होत आहे. त्याच प्रमाणे मनाई आदेश असतानाही नागरी भागातील रस्त्यांवर खाजगी वाहने मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. याद्वारे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत व या संस्थाच्या ५ कि.मी. परिसरातील सर्व बांधकामे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.तसेच जिल्ह्यातील कोणत्याही चारचाकी व दुचाकी वाहनास अत्यावश्यक कामाशिवाय मनाई करण्यात आली आहे. तसेच कोणतीही माल वाहतूक करणारी जड वाहने, ट्रॅक्टर रस्त्यावर येण्यास मनाई करण्यात आली आहे. हे आदेश ३१ मार्चपर्यंत लागू राहणार आहेत.कोरोनासाठी २ कोटींचा निधीपरभणी : कोरोना संदर्भात उपाययोजना करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २ कोटी रुपयांचा निधी आरोग्य विभागाला देण्यात आला आहे. या संदर्भातील आदेश शनिवारी काढण्यात आले.राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्याने या संदर्भात उपाययोजना करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत निधी उपलब्ध करुन देण्याचे आदेश राज्याच्या नियोजन विभागाने २० मार्च रोजी दिले होते. त्यानुसार जिल्हा नियोजन विभागाच्या वतीने २ कोटी रुपयांचा निधी आरोग्य विभागाला देण्यात आला आहे. त्यामध्ये १ कोटी ५० लाख रुपये जिल्हा शल्यचिकित्सकांना देण्यात आले असून ५० लाख रुपये जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीcorona virusकोरोना वायरस बातम्याtwo wheelerटू व्हीलरPoliceपोलिस