औरंगाबाद-जिंतूर रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 17:49 IST2019-01-31T17:49:32+5:302019-01-31T17:49:58+5:30
कर्नावळ पाटीजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली.

औरंगाबाद-जिंतूर रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू
देवगावफाटा (जि. परभणी)- अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना ३० जानेवारी रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास औरंगाबाद- जिंतूर रस्त्यावर कर्नावळ पाटी येथे घडली.
जिंंतूर येथील जहीर भाई पठाण (वय ३५) आणि सय्यद सोफियाना (वय ३०) हे दोघे कामानिमित्त मंठा येथे गेले होते. बुधवारी रात्री एम.एच.२२-ए.सी. २६१९ या दुचाकीने ते जिंतुरला परत येत असताना देवगावफाटा येथून जवळच असलेल्या कर्नावळ पाटीजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकीचालक जहीर भाई पठाण यांचा जागीच मृत्यू झाला असून पाठीमागे बसलेले सय्यद सोफियाना हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कर्नावळ येथील ग्रामस्थांनी मदतकार्य करून जखमींना मंठा येथील रुग्णालयात हलविले. या प्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असल्याची माहिती मिळाली.