शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

कुलूप लावलेले दोन कोविड सेंटर पुन्हा उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:19 IST

परभणी: कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने शहरातील दोन कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, मंगळवारी ...

परभणी: कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने शहरातील दोन कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, मंगळवारी या इमारती अधिग्रहीत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

डिसेंबर महिन्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने सर्व कोविड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मागच्या दोन महिन्यात या केंद्रांना चक्क कुलूप लागले होते. परभणी शहरात तीन कोविड केअर सेंटर सुरू होते. त्यापैकी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय आणि अक्षदा मंगल कार्यालयाचे कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी घेतला असून, त्यानुसार २३ फेब्रुवारी रोजी या दोन्ही इमारती अधिग्रहीत करण्याची कारवाई सुरू होती. त्यामुळे मंगळवारी तरी या सेंटरमध्ये एकही रुग्ण उपचार घेत नव्हता. या इमारती ताब्यात घेतल्यानंतर आरोग्य विभाग त्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करणार आहे.

शहरातील कोविड केअर सेंटर रुग्ण

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय : ००

अक्षदा मंगल कार्यालय : ००

तालुक्याच्या ठिकाणी एकही केंद्र नाही

तालुक्याच्या ठिकाणी अद्याप एकही केंद्र सुरू झाले नाही. जिंतूर, बोरी, पाथरी, मानवत, पूर्णा, पालम, सोनपठ, गंगाखेड, सेलू या ठिकाणी हे केंद्र यापूर्वी कार्यरत होते. रुग्ण संख्या वाढीचा वेग लक्षात घेऊन हे केंद्र सुरू केले जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

गंगाखेड तालुक्यात पुन्हा तीन रुग्ण

गंगाखेड तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने मागच्या दोन-तीन महिन्यात या तालुक्यात एकही रुग्ण नोंद झाला नव्हता. मात्र मागील आठवड्यात दोन विद्यार्थ्यांसह एका ५० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने तालुकावासियांची चिंता वाढली आहे. कोविडच्या पहिल्या टप्प्यात गंगाखेड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण होते. आता पुन्हा तीन रुग्णांची भर पडली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने कोविड केअर सेंटर सुरू केले जाणार आहेत. परभणीतील दोन इमारती त्यादृष्टीने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली असून, टप्प्या-टप्प्याने तालुक्याच्या ठिकाणचे केंद्रही सुरू केले जाणार आहेत. प्रशासनाने कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना सुरू केल्या आहेत.

दीपक मुगळीकर, जिल्हाधिकारी