शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

मानवतमध्ये रेल्वे सिग्नल यंत्रणेत बिघाडाने वाहतूक खोळंबली; वारंवारच्या बिघाडाने प्रवासी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 13:42 IST

सिग्लन यंत्रणेतील बिघाडाची तीन दिवसांतील दुसरी वेळ

ठळक मुद्देमराठवाडा एक्स्प्रेस पाऊणतास थांबलीरेल्वे फाटकावर वाहनांच्या रांगा

मानवत (जि. परभणी) : तालुक्यातील मानवत रोड रेल्वे स्थानकावर रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने तब्बल पाऊणतास धर्माबाद- मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस स्थानकाबाहेरच थांबविण्यात आली. तीन दिवसांमध्ये सिग्नल यंत्रणेत बिघाड होण्याची ही दुसरी घटना आहे. वारंवार सिग्नल यंत्रणेत बिघाड होत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मानवत शहरापासून ८ कि.मी. आणि पाथरी शहरापासून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या मानवत रोड रेल्वे स्थानकाचा वापर दोन्ही तालुक्यातील प्रवाशांना होतो. दररोज हजारो प्रवासी या स्थानकावरुन प्रवास करतात. मात्र मागील तीन दिवसांपासून सिग्नल यंत्रणेत बिघाड होण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. परभणीहून निघालेली धर्माबाद-मनमाड रेल्वे मानवत रोड रेल्वेस्थानकाजवळ आली. बिघाड झाल्याने स्थानकापासून ५०० मीटर अंतरावर सिग्नलच्या बाहेर ही गाडी थांबवावी लागली. सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त करण्यासाठी ४५ मिनिटे लागला. त्याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागला. अगोदरच एक तास उशिराने धावत असलेली मराठवाडा एक्सप्रेस मानवत रोड रेल्वे स्थानकावरून ४५ मिनिटे उशिराने पुढील प्रवासाला निघाली. तीन दिवसांपूर्वीही नांदेड-दौंड या  रेल्वेतील प्रवाशांनाही  बिघाडाचा सामना करावा लागला.

उड्डाण पुलाचे काम संथ गतीने : राष्ट्रीय महामार्गावर मानवत-परभणी दरम्यान बायपास मार्ग तयार केला जात आहे. या मार्गामुळे परभणीचे अंतर २ ते अडीच कि.मी.ने कमी होणार आहे. मात्र उड्डाण पुलाचे काम संथ गतीने सुरू असल्याने वाहनचालक मानवत रोडकडून प्रवास करतात. या मार्गावरील रेल्वे फाटक दिवसभरात ३५ ते ४० वेळा बंद राहते. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम गतीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे. 

रेल्वे फाटकही एक तास बंदयंत्रणेत बिघाड झाल्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील रेल्वे फाटक बिघाड दुरुस्त होईपर्यत बंद ठेवले जाते. त्यामुळे वाहनचालकांंना फाटकावर ताटकळत थांबावे लागते. येथील रेल्वे फाटकाचे कनेक्शन सिग्नल यंत्रणेशी असल्याने मानवत स्थानकावरून आलेली रेल्वे पुढील स्थानकाकडे निघाल्यास रेल्वे स्थानकापासून ५०० मीटर अंतराच्या पुढे गेल्यानंतर फाटक आपोआप उघडते. मात्र बिघाडाच्या काळात हे फाटक बंद राहत असल्याने त्याचा फटका रेल्वे प्रवाशांसह राष्ट्रीय माहामार्गावरील प्रवाशांनाही सहन करावा लागत आहे.

टॅग्स :railwayरेल्वेparabhaniपरभणीpassengerप्रवासी