शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

रजा मंजूर करण्यासाठी वाहतूक निरीक्षकाने घेतली लाच; एसटी महामंडळ परभणी आगारात एसीबीचा ट्रॅप

By राजन मगरुळकर | Updated: April 16, 2026 22:14 IST

- राजन मंगरूळकर  परभणी : परभणी आगारात कार्यरत तक्रारदार चालकाला मित्राच्या लग्नाला जाण्यासाठी एक दिवसाची रजा पाहिजे होती. ही ...

- राजन मंगरूळकर परभणी : परभणी आगारात कार्यरत तक्रारदार चालकाला मित्राच्या लग्नाला जाण्यासाठी एक दिवसाची रजा पाहिजे होती. ही रजा मंजूर करण्यास आगारातील वाहतूक निरीक्षक यांनी चक्क ५०० रुपयाची लाचेची मागणी केली. या तक्रारीवरून एसीबीच्या झालेल्या सापळा कारवाईत गुरुवारी वाहतूक निरीक्षकाने त्यांच्या कक्षात ही लाच रक्कम स्वीकारली. 

रतन नामदेव शेलार (४७, वाहतूक निरीक्षक गट क, एसटी महामंडळ, परभणी आगार) असे लाच स्वीकारलेल्या आरोपी लोकसेवकाचे नाव आहे. तक्रारदार परभणी आगारात चालक म्हणून कार्यरत असून त्यांनी आरोपी लोकसेवक रतन शेलार यांच्याकडे २१ एप्रिलला मित्राच्या लग्नाला जाण्यासाठी एक दिवसाची रजा मंजूर करण्याचा अर्ज दिला असता ही रजा मंजूर करण्यासाठी वाहतूक निरीक्षक शेलार यांनी ५०० रुपयाची लाच मागणी केल्याची तक्रार तक्रारदाराने एसीबी परभणी विभागाकडे बुधवारी दिली होती. या तक्रारीवरून एसीबीचे पोलीस उपअधीक्षक महेश पाटणकर यांच्यासह पथकाने पडताळणी केली. तक्रारदार व पंच यांना परभणी बसस्थानक कार्यालयात पाठविले असता आरोपी लोकसेवक शेलार यांनी ५०० रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून सापळा कारवाई दरम्यान वाहतूक निरीक्षकाच्या कक्षात ही लाच रक्कम तक्रारदार यांच्याकडून आरोपी लोकसेवक याने स्वीकारली. मोबाईल जप्ती, आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. संबंधित आरोपी लोकसेवकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सापळा अधिकारी महेश पाटणकर, तपास अधिकारी मनीषा पवार यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Transport Inspector Bribed for Leave; ACB Trap in Parbhani

Web Summary : A transport inspector in Parbhani demanded a 500-rupee bribe from a bus driver for leave approval. ACB laid a trap and caught the inspector red-handed accepting the bribe in his office. An investigation is underway.
टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरण