विजेच्या धक्क्याने तीन शेळ्यांचा मुत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:16 IST2020-12-24T04:16:40+5:302020-12-24T04:16:40+5:30

पाथरी तालुक्यातील हादगाव येथील रहिवासी मारोती पिराजी लालझरे यांचा शेती व शेळीपालनाचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे ५० शेळ्या आहेत. ...

Three goats die due to electric shock | विजेच्या धक्क्याने तीन शेळ्यांचा मुत्यू

विजेच्या धक्क्याने तीन शेळ्यांचा मुत्यू

पाथरी तालुक्यातील हादगाव येथील रहिवासी मारोती पिराजी लालझरे यांचा शेती व शेळीपालनाचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे ५० शेळ्या आहेत. १९ डिसेंबर रोजी मारुती लालझरे संध्याकाळी नेहमी प्रमाणे जेवण झाल्यानंतर कुटूंबासह घरात झोपले होते. मध्यरात्री दोनच्या सुमारास घराशेजारी बांधलेल्या जनावरांनी आवाज केल्यानंतर शेजाऱ्यांनी मारुती लालझरे यांना घराच्या पत्रामध्ये व तार कंपाउंड मध्ये विद्युत प्रवाह असल्याचे निदर्शनास आणून दिले. या विद्युत प्रवाहामुळे त्यांची एक शेळी व दोन पिल्ले मृत पावले होते. यासंदर्भात मारुती लालझरे यांनी चुलत भावाने घर व तार कंपाउंड मध्ये विद्युत प्रवाह सोडत वीस हजार रुपये किंमतीच्या शेळी व दोन पिल्ले यांना ठार केल्याची पाथरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे .या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Three goats die due to electric shock