आखाड्यावरील तीन जनावरे चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:26 IST2021-02-23T04:26:31+5:302021-02-23T04:26:31+5:30

जिंतूर तालुक्यातील दुधगाव येथील वैजनाथ बाळासाहेब गारुडी यांचा परभणी तालुक्यातील झरी शिवारात आखाडा आहे. या आखाड्यावर त्यांनी १९ फेब्रुवारी ...

Three animals were stolen from the arena | आखाड्यावरील तीन जनावरे चोरीस

आखाड्यावरील तीन जनावरे चोरीस

जिंतूर तालुक्यातील दुधगाव येथील वैजनाथ बाळासाहेब गारुडी यांचा परभणी तालुक्यातील झरी शिवारात आखाडा आहे. या आखाड्यावर त्यांनी १९ फेब्रुवारी रोजी एक गाय, एक बैल, एक शेळी अशी तीन जनावरे दावणीला बांधली होती. दिवसभर शेतात काम करून रात्री ९.३० च्या सुमारास ते दुधगाव येथे परतले. त्यानंतर २० फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता वैजनाथ गारूडी यांचे भाऊ जगन्नाथ गारूडी हे आखाड्यावर गेले असता त्यांना तिन्ही जनावरे दिसली नाहीत. गारूडी यांनी इतरत्र या जनावरांचा शोध घेतला असता ती आढळून आली नाहीत. त्यामुळे ५५ हजार रुपयांची ३ जनावरे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद वैजनाथ गारूडी यांनी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Three animals were stolen from the arena