तहसील कार्यालयात सोशल डिन्ससचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:12 IST2020-12-27T04:12:53+5:302020-12-27T04:12:53+5:30

पालम: तहसील कार्यालयात मागील चार दिवसांत पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहे. कोरोना परिस्थिती असतानाही मोठ्या प्रमाणात गर्दी ...

Social tensions in the tehsil office | तहसील कार्यालयात सोशल डिन्ससचा बोजवारा

तहसील कार्यालयात सोशल डिन्ससचा बोजवारा

पालम: तहसील कार्यालयात मागील चार दिवसांत पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहे. कोरोना परिस्थिती असतानाही मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, सोशल

डिस्टन्सचा बोजवारा उडाला आहे. तसेच मास्कचा वापरही केला जात नाही. त्यामुळे स्थिती चिंताजनक बनली आहे.

पालम तालुक्यातील ५३ ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. संपूर्ण ग्रामपंचायत एकाच टप्यात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे दिवस भर तहसिल कार्यालयात इच्छूक उमेदवार व त्याचे समर्थक हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येत आहे. तहसील कार्यालयात सभागृह, प्रवेशद्वार या ठिकाणी टेबल लावण्यात आले आहेत. या ठिकाणी अर्ज खरेदी, अर्ज दाखल करणे यासह विविध कामांसाठी गर्दी होत आहे. कोरोना परिस्थिती असतानाही याकडे पुर्णतः पाठ फिरवली जात आहे. तहसील कार्यालयाकडूनही कसल्याही नियमांचे बंधन केले जात नाही. त्यामुळे सोशल डिन्ससचा बोजवारा उडाला आहे. तर मास्कचा वापरही अजिबात केला जात नाही.

Web Title: Social tensions in the tehsil office