शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

परभणीत रमाई घरकुलांसाठी शिवसेनेचे घेराव आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 3:39 PM

: रमाई घरकूल योजनेंतर्गत ५३ कोटी रुपयांचा निधी वर्षभरापासून पडून आहे.

परभणी : रमाई घरकूल योजनेंतर्गत ५३ कोटी रुपयांचा निधी वर्षभरापासून पडून आहे. यामुळे गोरगरीबांना घरकुलाचा लाभ मिळत नसल्याने आज दुपारी आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेसमोर शिवसेनेच्या वतीने घेराव आंदोलन करण्यात आले़ 

शहरातील गोरगरीब मागासवर्गीय लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी रमाई घरकूल योजनेंतर्गत प्रतिलाभार्थी २ लाख ५० हजार रुपये या प्रमाणे मागील वर्षात ४५ कोटी रुपये महापालिकेला प्राप्त झाले़ परंतु, वर्षभर एकाही लाभार्थ्याला योजनेचा लाभ मिळाला नाही़ त्यामुळे या प्रश्नावर शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिला होता़ आज सकाळपासूनच शहरातील विविध भागांमधून लाभार्थी महिला, पुरुष मोर्चाद्वारे महापालिकेच्या कार्यालयासमोर दाखल झाले़ दुपारी १ वाजेच्या सुमारास घेराव आंदोलनास प्रारंभ झाला़

यावेळी आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्यासह शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख डॉ़ विवेक नावंदर, माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, उपजिल्हाप्रमुख सदाशिव देशमुख, संजय गाडगे, गटनेते चंद्रकांत शिंदे, नगरसेवक सुशील कांबळे, प्रशास ठाकूर, माजी विरोधी पक्षनेत्या अंबिका डहाळे, नंदू पाटील, नंदू आवचार, रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांची प्रमुख उपस्थिती होती़ 

१५ दिवसांत घरकुलाचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाले नाही तर या पुढे आणखी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा आ़ डॉ़  राहुल पाटील यांनी दिला़ तसेच परभणी शहरातील सर्व झोपडपट्ट्या नियमित करण्यासाठीही आपण विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करणार असल्याचे सांगितले़ या आंदोलनात परभणी शहरातील विविध  भागांमधील लाभधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते़

 

टॅग्स :agitationआंदोलनShiv SenaशिवसेनाParbhani Municipal Corporationपरभणी महानगरपालिका