शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
5
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
8
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
10
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
11
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
12
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
15
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
16
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
17
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
18
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
19
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
20
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
Daily Top 2Weekly Top 5

वाळू घाटाच्या लिलावातून १८ कोटी ३९ लाखांचा महसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:17 IST

परभणी : वाळू घाटाच्या लिलाव प्रक्रियेतून जिल्हा प्रशासनाच्या तिजोरीत १८ कोटी ३९ लाख ६५ हजार १३५ रुपयांचा महसूल जमा ...

परभणी : वाळू घाटाच्या लिलाव प्रक्रियेतून जिल्हा प्रशासनाच्या तिजोरीत १८ कोटी ३९ लाख ६५ हजार १३५ रुपयांचा महसूल जमा झाला आहे. आणखी काही वाळू घाटांचे लिलाव केले जात असून, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महसुलात आणखी वाढ होईल.

जिल्ह्यात मागील वर्षी एकाही वाळू घाटाचे लिलाव झाले नव्हते. त्यामुळे प्रशासनाला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. यावर्षी प्रशासनाने वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे. राज्य पर्यावरण समितीकडे ३० वाळू घाटांच्या लिलावाची परवानगी मागण्यात आली होती. मात्र, त्यापैकी केवळ २२ वाळू घाटांचा लिलाव करण्यास परवानगी मिळाली. या घाटांची लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात १४ वाळू घाटांचा लिलाव पूर्ण झाला आहे. त्यातून जिल्हा प्रशासनाला १८ कोटी ३९ लाख ६५ हजार १३५ रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात गोदावरी, पूर्णा आणि दुधना या तीनही नद्यांवरील वाळू घाटांचे लिलाव करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. एकूण २२ वाळू घाटांच्या लिलावातून २५ कोटी ५२ लाख रुपयांचा महसूल प्रशासनाला अपेक्षित होता. मात्र, सध्यातरी १८ कोटी ३९ लाख रुपये महसूल जमा झाला आहे.

जिल्हा प्रशासनाने आणखी काही वाळू घाटांचा लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. त्यातून लवकरच महसुलात वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. वाळू घाटांचा लिलाव झाल्यास खुल्या बाजारातील वाळूचे दर कमी होतील आणि बांधकाम व्यावसायिकांना त्याचा लाभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लिलाव प्रक्रिया लवकर व्हावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

दीड कोटी रुपये वसूल

मागील वर्षभरात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा सुरू झाला आहे. अवैध उपसा करणार्‍या वाळू चोरांविरुद्ध महसूल प्रशासनाने कारवाई केली आहे. वर्षभरामध्ये एकूण २५५ प्रकरणात १ कोटी ६५ लाख ३८ हजार रुपयांचा दंड प्रशासनाने वसूल केला आहे. अवैध वाळू उपशातून जप्त केलेली वाळू सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

या वाळू घाटांचा लिलाव पूर्ण

सोनपेठ तालुक्यातील पोहंडुळ, परभणी तालुक्यातील नांदगाव खुर्द, पिंपळगाव टोंग, गंगाखेड तालुक्यातील महातपुरी, पिंपरी झोला, भांबरवाडी, आनंदवाडी, पूर्णा तालुक्यातील गोळेगाव, धनगर टाकळी, पिंपळगाव सारंगी, मानवत तालुक्यातील वांगी, सेलू तालुक्यातील काजळी रोहीणा, पालम तालुक्यातील दुटका, सेलू तालुक्यातील मोरेगाव या १४ वाळू घाटांचा लिलाव पूर्ण झाला आहे. उर्वरित वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यास जिल्ह्यात वाळूचे भाव आणखी कमी होण्याची शक्यता आहे.